🌟पुर्णा तालुक्यातील मौजे कात्नेश्वर येथे संचालक विस्तार दिलीप झेंडे यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आला पीक कापणी प्रयोग.....!


🌟पीक कापणी प्रयोगाचे आयोजन कृषी सहाय्यक डि.डी.विखे यांनी केले होते🌟

 पुर्णा : पुर्णा तालुक्यातील रोजी मौजे.कातनेश्वर येथे दि.२९ फेब्रुवारी २०२४ रोजी पीक कापणी प्रयोग संपन्न झाला यावेळी प्रमुख उपस्थितांमध्ये संचालक विस्तार व प्रशिक्षण कृषी आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे मा.दिलीप झेंडे,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी परभणी रवी हरणे, तंत्र अधिकारी मुकुंद खिस्ते, तालुका कृषी अधिकारी पूर्णा, निलेश अडसुळे   यांच्या मार्गदर्शनाखाली हा पीक आपली प्रयोग घेण्यात आला . यामध्ये एक गुंठ्यामध्ये 52 किलो वजन आले तर एक हेक्टर साठी 50 क्विंटल उत्पन्न शेतकऱ्यांनी काढले. उपस्थित  कृषि अधिकारी प्रवीण काळे,कृषी पर्यवेक्षक रमेश जाधव,  कृषी सहाय्यक कातनेश्वर डी.डी. विखे, कृषी सहाय्यक रणेर, गोठवाल. जि. अ . कार्यालयातील अमोल शिंदे  या सर्वांच्या उपस्थितीमध्ये पीक कापणी प्रयोग पार पडला कार्यक्रम ज्ञानोबा विठ्ठल चापके, कात्नेश्वर यांच्या शेतात गहु बागायत पीकाचा  पीक कापणी प्रयोग करण्यात आला, कार्यक्रम यशस्वी रितेसाठी बापूराव चापके,शिवाजी चापके,शेषराव चापके,मुळे हे सर्व शेतकरी उपस्थित होते, पीक कापणी प्रयोगाचे आयोजन कृषी सहाय्यक डी डी विखे यांनी केले होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या