🌟परभणी शहरातील लक्ष्मी नगर येथील रहिवासी कु.आरती तुळशीदास देशमुख यांची उपशिक्षणाधिकारी पदावर निवड.....!


🌟परभणी पोलीस दलात कार्यरत पोलीस हेडकॉन्स्टेबल तुळशीदास देशमुख यांची कु.आरती देशमुख मुलगी आहे🌟 

परभणी (दि.२५ मार्च) - परभणी शहरातील लक्ष्मी नगर येथील रहिवासी कु.आरती तुळशीदास देशमुख यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा नुकत्याच जाहीर झालेल्या निकालानुसार उपशिक्षणाधिकारी पदावर निवड झाली असून कु.आरती देशमुख या परभणी पोलीस दलात कार्यरत पोलिस हेडकॉन्स्टेबल तुळशीदास देशमुख यांची मुलगी आहे. 

आरती देशमुख या केमिकल इंजिनियर असुन यापूर्वी सन २०२२ मध्ये त्यांची सेल टॅक्स इन्स्पेक्टर पदावर निवड झाली होती व सध्या त्या ठाणे येथील आयुक्त कार्यालय,जीएसटी भवन येथे या पदावर कार्यरत आहेत सेल टॅक्स इन्स्पेक्टर पदावर कार्यरत असतानाही त्यांनी आपला अभ्यास चालूच ठेवला व आता त्यांनी उपशिक्षणाधिकारी या पदापर्यंत झेप घेतली. 

आरती देशमुख यांचे प्राथमिक,माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण परभणी येथिल बालविद्या मंदीर शाळेत पुर्ण झाले तर अभियांत्रिकी पदवी त्यांनी AISSMS Engineering college Pune येथे पुर्ण केली. त्यांचे वडिल परभणी येथे हेड कॉन्स्टेबल या पदावर असून आई अनिता देशमुख या गृहिणी आहेत. आपल्या या यशाचे श्रेय त्या त्यांच्या आई वडिल व बालविद्या मंदीर शाळेतील सर्व गुरुजनांचा देतात. भविष्यातही स्पर्धा परीक्षेची तयारी चालूच ठेऊन अजून वरच्या पदांना गवसणी घालण्याची इच्छा असल्याचे त्यांनी सांगितले. आज परभणी येथे त्यांचे आगमन झाल्यानंतर त्यांचा सत्कार करून अभिनंदन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संतोष देशमुख, प्रा. रवी देशमुख , धनंजय देशमुख, आई अनिता व वडिल तुलसीदास देशमुख, माणिक शिंदे, सुनिता शिंदे, प्रदिप हरकळ, रमेश तायनाथ आदींची उपस्थिती होती. आरतीच्या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या