🌟मराठा आंदोलकावरील १०७ च्या जामिनासाठी लागले तब्बल बारा तास.....!


🌟पुर्णा तालुक्यातील गौर व कंठेश्वर येथील मराठा बांधवांना धरले पोलिसांनी वेठीस🌟


पुर्णा (दि.१९ मार्च) :- मराठा आरक्षण विषयी सगेसोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी करण्यासाठी मागील काही दिवसाखाली पूर्णा तालूक्यातील मराठा बांधवांनी सनदशीर लोकशाही मार्गाने काहीवेळच रस्तारोको केला होता.अशा मराठा बांधवावर स्थानीक पोलीसांनी वरिष्ठांच्या आदेशानुसार कलम १०७ नूसार गुन्हे नोंद करण्यात आले होते.त्यानूसार मराठा आंदोलकावर पोलीसी कार्यवाही करण्यात येवून नोटीसी पाठवण्यात आल्या.सदर गुन्ह्याची जामिन करण्यासाठी गौर कंठेश्वर येथील मराठा आंदोलकांना जिल्हा पोलिस अधीक्षक परभणी कार्यालयात तारीख १८ मार्च रोजी बोलवण्यात आले.त्याप्रमाणे मराठा आंदोलक सकाळी ११ वाजता दाखल झाले.परंतू त्यांची जामीन लवकर करण्यात आलीच नाही.दिवसभर ताटकळत उपासपोटी बसवून वेठीस धरले.रात्री १२ वाजेनंतर जामीन दिल्या.त्यामुळे मराठा आंदोलकांना एखाद्या मोठ्या कैद्या प्रमाणे पोलीस प्रशासनाने वेठीस धरल्यामुळे त्यांना तहान भुक लागली असता उठूनही जाता येईना जामीननंतर भुकेवर खान्यासाठी त्यांच्याजवळ पैसेही नव्हते.या प्रकारामुळे त्यांची मोठी हेळसांड झाली.


*******************************************

मराठा आरक्षण सगेसोयरे अधिसूचना कायदा अंमलबजावणीच्या मागणीसाठी पूर्णा तालूक्यातील असंख्य सकल मराठा बांधवांनी रस्ता रोको केला होता.हा रस्ता रोको संपूर्ण महाराष्ट्र राज्यात झाला. त्यातील आंदोलकांवर पोलीसांनी गुन्हे दाखल केले. त्याची जमानत घेण्यासाठी तहसिल ऐवजी परभणी येथील पोलीस अधीक्षक कार्यालयात बोलवण्यात आले.तेथे गौर कंठेश्वर येथील मराठा आंदोलक सकाळी ११ वाजता गेले होते.त्यांना दिवसभर बसवून ठेवत रात्री उशिरा १२ वाजुन गेले तरी जामीन दिलीच नव्हती.अक्षरशः रात्री १२ वाजेपर्यंत उपाशी रहावे लागले.आम्हा मराठा बांधवांवर सरकारच्या आदेशाने पोलिस प्रशासनाने वेठीस धरुन अन्यायच केल्याचे अनूभवयास आले.

सर्व मराठा समन्वयक व आंदोलक पूर्णा

*******************************************

🌟 ईसीबीसी आणि १० टक्के आरक्षणाचेही मिळेणा प्रमाणपत्र

मराठा विद्यार्थी युवक युवतींना सध्या ई डब्लू एस आणि सरकारने नव्याने बहाल केलेले दहा टक्के आरक्षण या दोन्ही प्रक्रियेतील आरक्षणाचे कुठलेच प्रमाणत मिळत नसल्याने आगामी काळात होणाऱ्या पोलिस भरतीसाठी मराठा समाजातील युवक युवतींना आरक्षणापासुन वंचीत राहण्याची वेळ आली आणि. सध्या पोलिस भरतीसाठी आँनलाईन नोंदणी सुरु असून शेवटची तारीख ३० मार्च आहे.त्यामुळे असंख्य मराठा युवक पोलिस भरतीच्या अनूषंगाने दहा टक्के आरक्षण व ई डब्लू एस मधून प्रमाणपत्र काढण्यासाठी महाईसेवा केंद्रावर गेले असता तेथे कागदपत्रे सबमिट होत नाहीत.त्यामुळे प्रमाणपत्र निघत नाही.....

नवीन दहा टक्के दिल्यामुळे ईडब्लूएस रद्द झाली आहे नवीन 10% साठी ऑनलाईन केल्यानंतर 2014 नुसार 16 टक्के आरक्षण च्या फॉरमॅटमध्ये ते येत आहे असं तहसीलदार सांगत आहेत नवीन दहा टक्के चा फॉरमॅट आणखीन महा-ई-सेवा केंद्रावरील ऑनलाईन आलेला नाही त्यामुळे हे दहा टक्के चे प्रमाणपत्र तहसीलदार यांनी बंद केले आहे आणि हे दहा टक्के दिल्यामुळे इडब्लूएस सुद्धा बंद आहे त्यामुळे दोन्ही प्रमाणपत्र मराठा मुलांना मिळत नाहीये

*******************************************

🌟नवीन दहा टक्के आरक्षण प्रमाणपत्र देण्यासाठी नवीन विहीत नमून्यातील फोरमेट आले नाही - तहसिलदार बोथीकर 

शासनाने मराठा समाजासाठी जाहीर केलेले नवीन दहा टक्के आरक्षण प्रमाणपत्र देण्यासाठी नवीन विहीत नमून्यातील फोरमेट आले नाही.काही दिवसात येईलच.त्यानंतर दहा टक्यातील आरक्षण प्रमाणपत्र ‌मिळू शकेल.

तहसिलदार पूर्णा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या