🌟नांदेड येथील नामांकित गॅंगच्या नावावर तब्बल ०८ कोटी रुपयांची खंडणी मागणारा भामटा पोलिसांच्या ताब्यात....!


🌟कर्जातून बाहेर पडण्यासाठी लढवली अनोखी शक्कल : खरेदी केलेल्या जून्या मोबाईल मधील व्हाट्सअपचा घेतला फायदा🌟

नांदेड (दि.२३ मार्च) - नांदेड येथील एका महाभागाने जुना खरेदी केलेल्या मोबाईल मधील सोशल साईट्स व्हाट्सअपचा गैरफायदा घेत चक्क संपूर्ण राज्यासह देशात गाजलेल्या नामांकित गॅंगस्टरच्या गॅंगच्या नावाचा वापर करीत एका भामट्याने ०८ कोटी रुपयांची खंडणी मागीतल्याचा गंभीर प्रकार समोर आला असून नांदेड पोलीसांनी सायबर सेलच्या साहाय्याने संबंधित भामट्याचा शोध लावून त्याच्या मुसक्या आवळल्या असून त्याच्यावर शिवाजीनगर पोलिस स्थानकात गुरनं.९९ चे कलम ३८४,३८५,३८६,५०७ भांदवि प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून सदर गुन्ह्यातील आरोपी अटक करणेबाबत पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी खंडणी विरोधी पथकास आदेशीत केले होते.


पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या आदेशावरून खंडणी विरोधी पथकाचे प्रमुख पो.नि.जगदीश भंडरवार,पोलिस उपनिरीक्षक दशरथ आड़े यांनी सदर गुन्ह्यातील आरेपीचा शोध घेत असताना फिर्यादी मध्ये नमूद संशयित मोबाईल क्रमांक धारकाचे सायबर सेलच्या मदतीने तांत्रिक विश्लेषन करुन सदर मोबाईल क्रमांक धारकास ताब्यात घेऊन चौकशी केली असता आरोपी नितीन सूर्यवंशी नामक महाभागाने दि.२१ फेब्रुवारी २०२४ रोजी जुना मोबाईल खरेदी केला तेव्हा मोबाईल मध्ये व्हंटसअपसह सर्व अप चालूच होते. त्याला मार्केट मध्ये लोकांचे पैसे देणे असल्याने व खरेदी केलेल्या जून्या मोबाईल मध्ये व्हाट्सअप चालु असल्याने याचा फायदा घेऊन आरोपी नितीन संजय सूर्यवंशी याने व्हाट्सअपचा गैरवापर करीत त्याचे ओळख असलेल्या फिर्यादीस रिंदा गॅंग से बोल रहा हूँ.....बचना हैं तो ०८ कोटी रुपये दे असे म्हणून खंडणीची मागणी केली होती. 

सदरची कारवाई मा.पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे,अपर पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार,अपर पोलोस अधीक्षक खंडेराव धरणे यांचे मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाचे पो.नि.जगदीश भंडरवार, पोउपनि.दशरथ आडे,गंगाप्रसाद दठवी, हरजिदरसिंघ चावला, पोहेकों राजु सिटोकर, दिपक ओढणे, पोना बंडु कलंदर, पोकों राजीव बोधगिरे, साहेबराव कदम, अनिल बिरादार, अशोक म्हस्के,इस्राईल शेख, अकबर पठाण यांनी पार पाडली......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या