🌟मानवी जीवन हे क्षणभंगुर आहे आपणाला जे काही आयुष्य लाभले त्याचा सदुपयोग मानवी कल्याणासाठी झाला पाहिजे....!


🌟भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर व तथागत भगवान बुद्ध सार्वजनिक जयंती मंडळ अध्यक्ष भदंत बोधिधम्मा यांचे प्रतिपादन🌟

पुर्णा (दि.३१ मार्च) - पुर्णा येथील बुध्द विहारात आज रविवार दि.३१ मार्च रोजी अखिल भारतीय भिकू संघाचे कार्याध्यक्ष भदंत डॉ.उपगुप्त महाथेरो यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली साप्ताहिक वंदनेचा व धम्मदेशनेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी पूज्य भदंत पयावंश पूज्य भदंत बोधिधम्मा यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी आपल्या प्रमुख धम्मदेशनेमध्ये भदंत बोधिधम्मा यांनी कुशल कर्माचे महत्त्व विशद केले मानवी जीवन हे क्षणभंगुर आहे आपणाला जे काही आयुष्य लाभले आहे त्याचा सदुपयोग मानवी कल्याणासाठी झाला पाहिजे ज्याप्रमाणे अगरबत्ती प्रज्वलित झाल्यानंतर सुगंध देते त्याचप्रमाणे आयुष्यभर आपण सत्कर्म केले पाहिजे अगरबत्ती विझ ल्यानंतर फक्त राख शिल्लक राहते त्या राखेचा कोणत्याही प्रकारे सुगंध येत नाही त्यामुळे जोपर्यंत आपण जीवित आहोत तोपर्यंत कुशल कर्म सातत्यपूर्ण केले पाहिजे आपलं अंतकरण हे आईचं अंतकरण असलं पाहिजे आई निरपेक्ष भावनेने आपल्या मुला-मुलीवर प्रेम करते त्याचप्रमाणे आपण ही संपूर्ण जीवसृष्टीवर प्रेम केले पाहिजे.

महामानव तथागत भगवान बुद्ध यांनी जगाला मानवतेचा करुणेचा महान आदर्श घालून दिला आहे तो आपण डोळ्यासमोर ठेवला पाहिजे महान धम्म प्रचारक अनागारिक धम्मपाल यांनी भारत देशामध्ये बुद्ध धम्म कशाशाप्रकारे गतिमान केला हे त्यांनी सोदाहरण दाखविले साप्ताहिक वंदनेला व धम्मदेशनेला  मोठ्या संख्येने श्रद्धा संपन्न उपासक उपासिका धम्म सेवेमध्ये कार्यरत असलेली महिला मंडळ आदींची उपस्थिती होती आशिर्वाद गाथेने कार्यक्रमाचा समारोप झाला......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या