🌟कृषी यांत्रिकीकरण व मूल्य वर्धनाद्वारे शेतकऱ्यांनी आपली आर्थिक प्रगती साधावी…. प्रा. डॉ.इंद्र मणी


🌟कृषी यांत्रिकीकरण व मूल्यवर्धन दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमा प्रसंगी ते बोलत होते🌟 


वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील अखिल भारतीय समन्वयीत संशोधन प्रकल्प पशु शक्तीचा योग्य वापर विभागाच्या वतीने बुधवार दि. २७/०३/२०२४ रोजी आयोजित अनुसूचित जाती उपयोजने अंतर्गत कृषी यांत्रिकीकरण व मूल्यवर्धन दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम व सुधारित शेती अवजाराचे हस्तांतरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. सदरील प्रशिक्षण कार्यक्रम विद्यापीठाचे मा. कुलगुरू प्रा. डॉ. इंद्र मणि आणि संचालक संशोधन डॉ. जगदीश जहागीरदार यांचे मार्गदर्शनाखाली उत्साहात पार पडला.

  या कार्यक्रमाचे अध्यक्ष वनामकृविचे मा. कुलगुरू प्रा.डॉ. इंद्र मणी हे होते. सदरील कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून संचालक संशोधन डॉ. जगदीश जहागीरदार, संचालक शिक्षण तथा अधिष्ठाचा (कृषी) डॉ. उदय खोडके, विद्यापीठ अभियंता श्री. दिपक कशाळकर, डॉ. राहुल रामटेके, डॉ. चंद्रकांत लटपटे यांची उपस्थिती होती. या प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन पशु शक्तीचा योग्य वापर योजना प्रमुख प्रा. डॉ. स्मिता सोळंकी यांनी केले आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी अन्नदाता पुरुष बचत गट, प्रकाशवाट शेतकरी उत्पादक कंपनी, आजेगाव, यशोधरा बचत गट, शिंदेफळ, सावित्रीबाई फुले महिला बचत गट, भिमक्रांती महिला बचत गट, पळशी तसेच वाघजडी ता. शेनगाव जिल्हा हिंगोली येथील ५० ते ६० महिला व पुरुष शेतकऱ्यांची उपस्थिती होती. सदरील कार्यक्रमासाठी डॉ. तुकाराम भुतकार (सहाय्यक प्राध्यापक) यांनी सहकार्य केले.

  या कार्यक्रम प्रसंगी मार्गदर्शन करताना मा. कुलगुरू म्हणाले की, सदरील सुधारित शेती अवजारांचा आपले शेतावर प्रत्यक्ष वापर करून कृषी निविष्ठांचा वापर कमी करावा तसेच कामाचे तास कमी करावेत. ही अवजारे शेतकऱ्यांचे श्रम कमी करून त्यांच्या उत्पादनवाढीस फायदेशीर ठरतील, तसेच आपल्या सोबतच आपल्या गावातील इतर शेतकऱ्यांना या अवजारे व सुधारित तंत्रज्ञानाचा लाभ द्यावा. तसेच आपल्या पिकाचे उत्पादन वाढीसाठी आवश्यक अवजारांबाबत संशोधन करण्यासाठी शास्त्रज्ञांना प्रोत्साहित करावे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ सदैव शेतकऱ्यांच्या पाठीशी राहील अशी ग्वाही दिली.

  प्रास्ताविकामध्ये कार्यक्रमाच्या आयोजिका तथा संशोधन अभियंता डॉ. स्मिता सोळंकी यांनी उपस्थित शेतकऱ्यांना सुधारित अवजारे तंत्रज्ञानाबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. संजय देशमुख इंजि.अजय वाघमारे श्री. दिपक यंदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी पुढाकार घेतला.......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या