🌟नांदेड जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पाऊस व गारपीटीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान....!


🌟जिल्ह्यातील नायगाव,कंधार,बेटक बिलोली,मस्तापूरात शेतकऱ्यांच्या शेतातील उभ्या पिकांचे नुकसान🌟 

नांदेड (दि.१६ मार्च) - नांदेड जिल्ह्यात आज शनिवार दि.१६ मार्च २०२४ रोजी सायंकाळी ०४-०० वाजेच्या सुमारास जिल्ह्यातील अनेक भागात वादळीवाऱ्यासह मुसळधार पाऊस व गारपीटीला सुरुवात झाल्याने शेतकऱ्यांच्या शेतातील उभ्या पिकांचे ज्यात गहू करडी ज्वारी,उन्हाळी उडीद,उन्हाळी तुरीसह भाजीपाला बागायती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.


जिल्ह्यातील नायगाव,कंधार,बेटक बिलोलीसह नरसी,मूस्तापुर येथे मुसळधार पावसासह झालेल्या तुफान गारपीटीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास या मुसळधार पाऊस व गारपीटीमुळे हिरावला गेल्यामुळे शेतकरी वर्ग हवालदिल झाल्याचे निदर्शनास येत आहे.....टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या