🌟ज्येष्ठ पत्रकार सुरेश पाटील यांना मारहाण : मराठवाड्यात पत्रकार संरक्षण कायद्याने पहिला गुन्हा दाखल......!


🌟आरोपींना अटक  उदगीर शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक किरण सोंनकवडे यांचे पत्रकारांनी मानले आभार🌟


 ✍️ मोहन चौकेकर                                              

उदगीर येथील ज्येष्ठ पत्रकार सुरेश पाटील नेत्रागावकर यांना भाजी मंडई रोड वरील मोहन वाईन्स या दुकाना समोर दोन तरुणांनी तेथील भाजी विक्रेत्यास अमानुष मारहाण करत असताना हटकल्याने त्या दोन युवकांनी पत्रकार सुरेश पाटील यांना अर्वाच्य शिवीगाळ करत लाता बुक्क्यांनी मारहाण करून तू पत्रकार आहेस नेत्रागाव कसा जातोस तुला खतम करतो म्हणून धमकी दिली असता सुरेश पाटील यांनी त्वरीत पोलिस ठाण्यात येऊन पोलिस निरीक्षक किरण सोंनकवडे यांना सांगताच त्यांनी पोलिस कर्मचारी पाठवुन दोन्ही आरोपीस त्वरीत अटक केली असून संबंधित दोन्ही आरोपीवर शहर पोलिस ठाण्यात गु.र.0077/2024 भारतीय दंड संहिता 1860 ने कलम 323,504,506,34 सह महाराष्ट्र प्रसार माध्यम व्यक्ती आणि प्रसार माध्यम संस्था ( हिंसा आणि मालमत्तेचे नुकसान प्रतिबंधक )अधिनियम 2017 कलम 4 ने गुन्हा दाखल केला असून आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत, शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक किरण सोंनकवडे यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून आरोपीस त्वरीत अटक करून त्यांच्यावर पत्रकार संरक्षण कायद्याने गुन्हा दाखल केल्याने मराठी पत्रकार परिषदेचे विभागीय सचिव सचिन शिवशेटे, पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती निमंत्रक अर्जुन जाधव, उदगीर जिल्हा मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष श्रीनिवास सोनी, पत्रकार भवन कृती समिती निमंत्रक युवराज धोतरे,विनायक चाकुरे,रोशन मुल्ला,अशोक कांबळे,संतोष जोशी,माधव घोने,विश्वनाथ गायकवाड, सुधाकर नाईक,संग्राम पवार, निवृत्ती जवळे सह सर्व पत्रकारांनी आभार व्यक्त केले आहे, पत्रकार संरक्षण  कायद्याने गुन्हा दाखल करण्याची मराठवाड्यातिल हि पहलीच घटना आहे......

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या