🌟महाराष्ट्र पोलीस दलाने आरोपीचा आत्मसन्मान व गोपनीयतेचा भंग होणार नाही याची खबरदारी घ्यावी....!


🔴पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांचे महाराष्ट्र पोलीस दलाला निर्देश🔴

🔴आरोपीला ०२ लाख रुपयांची नुकसान भरपाई : ताडदेव पोलीस स्थानकातील चार कर्मचाऱ्यांच्या वेतनातून होणार कपात🔴

मुंबई : महाराष्ट्र पोलीस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पोलीस कोठडीतील आरोपींच्या अंगावर पुरेसे कपडे असतील याची खबरदारी घ्यावी तसेच आरोपींचा आत्मसन्मान व गोपनीयता भंग होणार नाही याची काळजी घ्यावी असे निर्देश राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी पोलिस दलासाठी जारी केले आहे.

मुख्य सरकारी वकील ॲड.हितेन वेणेगावकर व सरकारी वकील ॲड.प्राजक्ता शिंदे यांनी पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांचे हे परिपत्रक न्यायालयात सादर केले सदरील परिपत्रक राज्यातील सर्व स्थानकांना देण्यात यावे जेणेकरून आरोपींच्या आत्मसन्मानाला धक्का लागणार नाही असे आदेश सन्माननीय न्यायाधीश रेवती मोहिते (ढेरे) व सन्माननीय न्यायाधीश मंजुशा देशपांडे यांच्या खंडपीठाने दिले.

पोलिस कोठडीत आरोपीचे कपडे काढणे अयोग्य असून असे प्रकार भविष्यात होता कामा नये यासाठी काय उपाययोजना केल्या जातील याचा खुलासा करण्याचे आदेश सन्माननीय न्यायालयाने पोलीस महासंचालकांना दिले होते त्यानुसार हे परिपत्रक पोलीस महासंचालक शुक्ला यांच्याकडून जारी करण्यात आल्याचे समजते.

🔴 प्रकरण नेमके काय ?

विनयभंगाचा आरोप असलेल्या एका प्रकरणात ताडदेव येथील आरोपी नितीन संपत यांना ताडदेव पोलीसांनी ताब्यात घेतले त्या विरोधात त्याची पत्नी निलीमा यांनी याचिका दाखल केली होती सातरस्ता पोलीस कोठडीत पोलिसांनी आपले पती नितीन संपत यांचे कपडे काढले असा आरोप याचिकेत करण्यात आला मुंबई पोलीस आयुक्त यांना या प्रकरणी चौकशी करण्याचे आदेश न्यायालयाने द्यावेत.पोलिसांनी बेकायदेशीर ताब्यात घेतल्याने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी देखील याचिकेत करण्यात आली आहे.

🔴 आरोपीला ०२ लाख रुपयांची नुकसान भरपाई : ताडदेव पोलीस स्थानकातील चार कर्मचाऱ्यांच्या वेतनातून होणार कपात :-

विनय भंगाच्या प्रकरणात ताडदेव पोलीसांनी ताब्यात घेऊन अंगावरील कपडे काढून पोलीस कोठडीत डांबले या प्रकरणात नुकसान भरपाई म्हणून नितीन संपत यांना ०२ लाख रुपये दिले असून सदरील रक्कम ताडदेव पोलीस स्थानकातील चार पोलिस अधिकाऱ्यांच्या वेतनातून वसूल केले जातील अशी माहिती गेल्या सुनावणीत प्रशासनाकडून न्यायालयाला देण्यात आली आहे.

🔴 परिपत्रकात नेमकं काय :-

कुठल्याही गुन्ह्यातील आरोपींची झडती घेतांना आरोपींचा आत्मसन्मान दुखावला जाणार नाही याची दक्षता घ्या,आरोपीला पोलीस कोठडीत ठेवण्या आधी आरोपीकडे काही हत्यार असेल तर काढून घ्या, आरोपीला कोठडीत डांबल्यावर त्याच्या अंगात पुरेसे कपडे असायला हवे, पोलीस स्थानकातील सिसीटीव्ही व अधिकारी निट काम करत आहेत की नाही यावर पोलीस स्थानकाच्या प्रमुखाने लक्ष ठेवावे, वरील सर्व मुद्द्यांची पोलीस स्थानकाच्या प्रमुखाने शहानिशा करावी...


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या