🌟परभणी जिल्ह्यातील वृद्ध साहित्यिक व कलावंतांनी कागदपत्रे सादर करण्याचे आवाहन......!


🌟राजर्षी शाहू महाराज वृद्ध साहित्यिक/कलावंतांना मानधन योजनेत मंजूर कलावंताना ऑनलाईन मानधन अदा करण्यात येते🌟

परभणी (दि.07 मार्च) :  राजर्षी शाहू महाराज वृद्ध साहित्यिक व कलावंत यांना मानधन योजनेमधील मंजूर कलावंताना ऑनलाइन पद्धतीने मानधन अदा करण्यात येते.  प्रधान सचिव, सांस्कृतिक कार्य विभाग, मुंबई यांच्या पत्रानुसार शासनाने ही योजना डीबीटीमार्फत राबवायची असून,  परभणी जिल्ह्यातील या योजनेतील सर्व मंजूर लाभार्थींचे मानधन जमा होत असलेल्या बँकखात्याच्या पासबुकची प्रत, आधार कार्ड, पॅनकार्ड, फोटो व मोबाईल नंबर इत्यादींच्या छायांकित प्रतीची परिपूर्ण माहिती आपल्या तालुक्यातील गटविकास अधिकारी, पंचायत समिती यांच्याकडे 12 मार्चपर्यंत जमा करावेत. माहे एप्रिल 2024 चे मानधन लाभार्थीच्या खात्यावर जमा होणार असल्याचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या