🌟मुंबई सेंट्रल रेल्वे टर्मिनसचा नामदार जगन्नाथ नाना शंकरशेट रेल्वे टर्मिनस मुंबई सेंट्रल असा नामविस्तार....!


🌟 राज्य शासनाने पाठवला केंद्राला प्रस्ताव : सकल भारतीय सोनार समाज संघटननेसह विविध सोनार संघटनांच्या मागणीला यश🌟

मुंबई सेंट्रल रेल्वे टर्मिनसचा नामदार जगन्नाथ नाना शंकरशेट रेल्वे टर्मिनस मुंबई सेंट्रल असा नामविस्तार व्हावा या सोनार समाज संस्थांनी नाना जगन्नाथ शंकरशेट प्रतिष्ठान, मुंबई यांनी केलेल्या मागणीसंदर्भात नुकताच महाराष्ट्र शासनाने निर्णय घेऊन केंद्राकडे प्रस्ताव पाठविला आहे. याबद्दल राज्य सरकारचे, या मागणीसंदर्भात पाठपुरावा करणाऱ्या विविध सोनार समाज संस्था आणि संघटना तसेच लोकप्रतिनिधींचे सकल भारतीय सोनार समाज संघटन आणि सेतुबंधन मध्ये समाविष्ट असलेल्या विविध सोनार समाज संस्था, संघटना सर्व शाखीय सोनार समाज बांधव आणि भगिनी यांचे मनस्वी नि हार्दिक अभिनंदन असे असले, तरी निवडणूक आचारसंहिता लागू होत असल्याने राज्य सरकारने पाठविलेल्या या प्रस्तावाची केंद्र सरकारने दखल घ्यावी, यासाठी राज्य सरकार पाठपुरावा करणार काय, यासंदर्भात सकल भारतीय सोनार समाज संघट चे शिष्टमंडळ मंत्रालयात गेले असता, राज्य सरकारमार्फत केंद्र सरकारला या प्रस्तावासंदर्भात स्मरणपत्र सादर करण्याविषयी सांगण्यात आले.

लोकसभा आचारसंहिता लागू होण्यापूर्वी किंवा प्रशासकीय कारणास्तव कदाचित नंतर नाना शंकरशेट मुंबई सेंट्रल रेल्वे टर्मिनस असा नामविस्तार होण्याची  अधिसूचना निर्गमित होण्याची आशा व खात्री आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या