🌟पंतप्रधान मा.मोदीजी,पूर्विच्या सरकारनीं ज्येष्ठ नागरिकांकडे अक्षम्य दुर्लक्ष केले आता आपल्या कडूनही होऊ नये - डाॅ.हंसराज वैद्य🌟नांदेड येथे लाही लाही तळपत्या उन्हात,गरीब,गरजवंत ज्येष्ठ नागरिकांची प्रचंड "लक्षवेधी पदयात्रा" संपन्न 🌟

नांदेड(प्रतीनिधी) :- नांदेड येथे बुधवार दि.13 मार्च 2024 रोजी लाही लाही तळपत्या उन्हात,गरीब,गरजवंत ज्येष्ठ नागरिकांची प्रचंड "लक्षवेधी पदयात्रा" संपन्न झाली आयोजकांच्या अपेक्षे पेक्षाही मोठी तथा नांदेडकरांच्या आजपर्यंच्या ईतिहासात एवढे मोठी,स्वंप्रेरित व स्वंय शिस्तित "ज्येष्ठ नागरिकांची" एकमेव लक्षवेधी पदयात्रा ठरली

*या पदयात्रेने अनेक वैशिष्ठे अधोरेखित केली*

1) उद्घाटण एका "गरजवंत अतिज्येष्ठ विधवा महिलेच्या हस्ते (नुक्त्याच जागतिक महिला दिन साजरा केल्याच्या पाराश्वभुमिवर)" हिरवी झंडी  दाखऊन करण्यात आले!*

2) संख्येंने, पुरूषां पक्षाहि महिलांची संख्या मोठी होती.

3) गरजवंत महिलांमध्ये "गरजवंत विधवा" महिलांची संख्या लक्षणीय होती.

4) या लक्षवेधी पदयात्रेत चार चार ज्येष्ठ नागरिकांची साखळी (एकमेकाचे हात धरून)श्रंखला तयार करून पदयात्रा निघालेली होती.

5) वजीराबाद चौकात शेवटचे टोक तर दर्शनी टोक जिल्हाधि कार्यालयाचे प्रवेश द्वार एवढी मोठी तथा लांबच लांब रांग होती.

6) कसल्याही जयघोषला तथा नारेबाजीला थारा नव्हता,मज्जाव होता.

7) देशाचे पंतप्रधान मा.नरेंद्र मोदीजीनां,मा.ना.एकनाथ रावजी शिंदे साहेब मु.मं. महाराष्ट्र राज्य,मा.ना.देवेंद्रजी फडणवीस व मा.ना.अजित दादा पवार उ.मु.मं द्वय म.रा. मुंबई यांना मा.जिल्हाधिकारी नांदेड मार्फत निवेदन पदयात्रेतील गरजवंत विधवा तथा दिव्यांग महिला पुरूषासह आयोजकांच्या हस्ते देण्यात आले.

8) ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, साहित्यिक,ज्येष्ठ नागरिक नेते तथा नांदेड भूषण डाॅ.हंसराज वैद्य यांनींच फक्त माध्यमाशी संवाद साधला व लाभार्थ्यांनां संबोधित केले अदी.

आमच्या प्रलंबित मागण्या अत्यंत न्याय,साध्या सरळ व व्यवहार्य अशाच आहेत.ज्येष्ठ नागरिक धोरण तंतोतंत अंमलात आणावे,देशातील इतर राज्या प्राणे ज्येष्ठांची वयोमर्यादा साठ वर्षच ग्राहय धरावे व सर्व मूलभूत सुख सुविधा विना अट देण्यात याव्यात, सर सकट नको पण गरीब,गरजवंत,दुर्लक्षित,उपेक्षित तथा वंचित शेतकरी,शेतमजूर, कष्टकरी,असंघटित कामगार, विधवा तथा दिव्यांग ज्येष्ठ नागरिकांना शेजारिल आंध्र,कर्णाटक,तेलंगानादि राज्या प्रमाणे प्रतिमहा किमान 3500/-रू सरळ बँक खात्यात शासनाने विना अट जमा करावेत,आरोग्य विमा शासनाने भरावा,एकूण जनसंख्येच्या आठरा टक्केज्येष्ठ नागरिक समूह असलेल्या,चळवळीतील एका जाणकार व्यक्तीस राज्य सभा व एकास विधान परिषषधेवर नेमणूक करण्याची  तरतूद करावी अदि.

"नरेंद्र मोदीजी आहेत,तर हे कांहीहि अशक्य नाही अशी आम्हा ज्येष्ठ नागरिकांची धारना व रास्त अपेक्षा आहे. ही होऊ घातलेली लोक सभेची निवडणूक किती महत्वाची आहे याची जाणीव आम्हाला आहे.आम्ही सकळ  ज्येष्ठ नागरिक घराघरातून मोदीजींचे प्रचारक व प्रसारक म्हणून "गँरंटीनी"काम करण्यास शिद्ध आहोत.या पूर्विच्या सरकारनीं आम्हा ज्येष्ठ नागरिकांच्या प्रश्नांकडे अक्षम्य दुर्लक्ष केलेले आहे.आता मा.नरेंद्रजी मोदी सरकारनीं तरी दुर्लक्ष करू नये अशी अपेक्षा व्यक्त करूयात.....*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या