🌟नांदेड दक्षिण मध्य रेल्वे विभागातील रेल्वे लोहमार्गाच्या विद्युतीकरणाचे काम पुर्ण....!

🌟परभणी-मुदखेड मार्गावर धावली पहिली विद्युत रेल्वे गाडी : रेल्वे विभागाकडून विशेष चाचणी🌟


नांदेड (दि.२९ मार्च) :  नांदेड दक्षिण मध्य रेल्वे विभागांतर्गत येणाऱ्या नांदेड विभागातील रेल्वे लोहमार्गावरील विद्युतीकरणाचे काम जवळपास शंभर टक्के पूर्ण झाले असून या लोहमार्ग विद्युतीकरणाच्या पार्श्‍वभूमीवर दक्षिण मध्य रेल्वे विभागाने आज शुक्रवार दि.२९ मार्च २०२४ रोजी मिरखेल ते मालटेकळी या लोहमार्गावर दोन विद्युत इंजन असलेली तब्बल आठ कोचची पहिली विशेष रेल्वेगाडी सोडून यशस्वी चाचपणी केली.

           दक्षिण मध्य रेल्वे विभागांतर्गत नांदेड विभागासह अन्य विभागातील एकूण ९२४ किलोमीटर लोहमार्गाच्या विद्युतीकरणाचे काम शंभर टक्के पूर्ण झाले आहे. उर्वरीत कामेसुध्दा प्रगतीपथावर आहेत. विद्युतीकरणाची सर्व कामे पूर्ण झाल्याबरोबर मनमाड-मुदखेड हा विभाग देशाच्या पश्‍चिम व दक्षिण भागाशी जोडला जाणार आहे. पश्‍चिमेला आर्थिक राजधानी मुंबई, दक्षिणेला हैद्राबाद, बँगलो आणि चेन्नई यांसारखी महत्वची शहरे आणि पूर्वेला नागपूर आणि बिलासपूर सारखी महानगरे जोडली जाणार आहेत. त्याचे महत्व लक्षात घेवूनच मनमाड-मुदखेड-ढोणे या रेल्वे मार्गाच्या विद्युतीकरणाच्या प्रकल्पास केंद्र सरकारने मंजूरी बहाल केली होती. २०१५/१६ या आर्थिक वर्षात ७८३ किलो मीटर अंतरासाठी ८६५ कोटी रुपये मंजूर केल्या गेले होते. पाठोपाठ विद्युतीकरणाची कामे या मार्गावरील वेगवेगळ्या भागात सुरु करण्यात आली. त्यामुळे या कामांना मोठा वेग आला. त्यातच मिरखेल ते मालटेकडी विभागातील ४३.३ किलो मीटर अंतराचे विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाल्या पाठोपाठ रेल्वे अधिकार्‍यांनी या मार्गावर तातडीने विद्युत रेल्वेची चाचपणी करण्याचा निर्णय घेतला. त्याप्रमाणे गुरुवारी या मार्गावर विद्युत रेल्वेस हिरवा कंदील दाखविण्यात आला.

           यावेळी दक्षिण मध्य रेल्वे विभागाचे उच्चपदस्त अधिकारी पी.डी. मिश्रा, नांदेड विभागाचे सहाय्यक विभागीय व्यवस्थापक आर.के. मीना, सहाय्यक परिचलन व्यवस्थापक विवेकानंद यलप्पा, विनोद साठे आदी उपस्थित होते. सायंकाळी ४.१५ वाजता या विशेष रेल्वे गाडीस हिरवी झेंडी दाखविण्यात आली. विद्युत रेल्वे चालक प्रदीप कुमार, गार्ड अरुण कुमार यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. मिरखेल स्टेशनचे मास्टर अख्तर पाशा यांनी हिरवी झेंडी दाखविल्यानंतर सिकंदराबादच्या पथकाने याच गाडीतून ठिकठिकाणच्या कामांची पाहणी केली.......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या