🌟सबंध भारतभर धूम उडवणाऱ्या - त्या तरूच्या सावलीलाचे कवी डॉ.विजयकुमार कस्तुरे यांचा नेपाळात हृदयस्पर्शी सन्मान....!


🌟नेपाळ येथील आंतरराष्ट्रीय कविसंमेलनाच्या अध्यक्षपदाने कवी डॉ.विजयकुमार कस्तुरे सन्मांनित🌟

✍️ मोहन चौकेकर 

काठमांडू नेपाळ : गेल्या दोन अडीच वर्षात महाराष्ट्रातील पुण्यात वाचनवेलच्या अखिल भारतीय महाकाव्य महा स्पर्धेतील सन्मान पटकावून कोल्हापूर, गोवा, गुजरात, दिल्ली, आंध्र, चेन्नई, तेलंगणा, तामिळनाडू, पाँडेचेरी इ. ठिकाणी अखंड घोडदौड करणाऱ्या आपल्या - त्या तरूच्या सावलीला चल सखे बोलू जरा - या भन्नाट लोकप्रिय कवितेसह, आपल्या सामाजिक समर्पणास्तव साऊथवेस्टर्न अमेरिकन विद्यापीठातर्फे मानद डॉक्टरेट पदवी प्राप्त डॉ. विजयकुमार कस्तुरे, ॲडव्होकेट, चिखली यांना, साहित्यधारा बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, औरंगाबाद/संभाजीनगर चे संस्थापक अध्यक्ष तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ अर्थशास्त्र प्राध्यापक व स्कॉटलंड यार्ड स्टुडंट्स ब्रॅंड ॲंबेसेडर असलेले डॉ. संघर्ष सावळे यांनी आपल्या संस्थेमार्फत नेपाळ - काठमांडू येथे आयोजित अंतर्राष्ट्रीय कविसंमेलनाच्या अध्यक्षपदी निमंत्रित करून त्यांचा व सोबतच त्यांच्या त्या कवितेचाही अंतर्राष्ट्रीय स्तरावर गौरव करून त्यांच्या किर्तीवर शिरपेच चढविला. एवढेच नाही तर या कविसंमेलनाचे तथा सोबतच संयुक्त रित्या साजरा करण्यात आलेल्या संत सेवालाल जयंतीच्या व पुरस्कार वितरणाच्या सोहळ्याचे प्रमुख अतिथी म्हणून निमंत्रित व सहकुटुंब उपस्थित असलेले माजी न्यायाधीश मा. नामदेव चव्हाण यांनी - या कवितेने आम्हांला नवचैतन्य मिळाले - असे उदगार काढले.

तर महाराष्ट्र राज्याचे माजी गृह विभाग सचिव मा. राजाराम जाधव यांनी - म्हातारपण विसरून टाकणारी उर्जा देणारी कविता - असे संबोधून आगळीवेगळी शाबासकी देत या कवितेला अंतराळ उंचीवर नेऊन ठेवले. याप्रसंगी सा.ब.से. संस्थेच्या वतीने चिखली, जि. बुलढाणा येथील सामाजिक न्याय परिषद पुरस्कार प्राप्त डॉ. डी. व्ही. खरात सरांना - अंतर्राष्ट्रीय समाज भूषण - तर फुले - आंबेडकरी चळवळीतील धम्मोपासक व आघाडीचे गायक कलावंत आयुष्मान भारत साबळे, चिखली यांना - अंतर्राष्ट्रीय धम्मरत्न - तसेच महिला जागृती तथा समुपदेशन कार्यात जवळजवळ अर्धे शतक अविरत कार्य करणाऱ्या चिखली येथील ॲडव्होकेट रेखा श्रावणराव हणमंते यांना - अंतर्राष्ट्रीय महिला जागृती व समुपदेशन - या पुरस्कार बरोबरच डॉ. आशा पारधे,नाशिक आणि ज्येष्ठ साहित्यिक तथा कवयित्री आयुष्मती शोभा वेले यांनाही अंतर्राष्ट्रीय पुरस्कारांनी गौरवण्यात आले. पुरस्कार वितरण व संत सेवालाल जयंतीचा हा अंतर्राष्ट्रीय सोहळा महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध साहित्यिक तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद/संभाजीनगर च्या संशोधक साहित्यिक तथा अर्थशास्त्र प्राध्यापक डॉ. अशोक पवार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होऊन यानिमित्ताने विविध क्षेत्रातील इतर मान्यवरांचाही सत्कार करण्यात आला. तसेच कवि संमेलन निमित्ताने अनेक मान्यवर लेखक कवींच्या पुस्तक व ग्रंथांचे प्रकाशनही करण्यात आले. तसेच या अंतर्राष्ट्रीय कवि संमेलनाच्या समारंभात महाराष्ट्रातील ख्यातनाम कथाकार व कवी डॉ. बबनराव महामुने, हिवरा आश्रम, बुलढाणा यांना विशेष निमंत्रित करून त्यांचाही, साहित्यिक तथा परकायाप्रवेशी कथाकथनास्तव अमेरिकन विद्यापीठाकडून मानद डॉक्टरेट/डिलिट मिळाल्या प्रित्यर्थ संस्थेच्या वतीने सन्मान करण्यात आला. या अविस्मरणीय सोहळ्याचे आयोजन तथा अल्पवयातंच आपल्या अध्यनशीलतेच्या जोरावर अंतर्राष्ट्रीय स्तरावरील स्कॉटलंड यार्ड स्टुडंट्स ब्रॅंड ॲंबेसेडर पदापर्यंत पोचणारे एकमेव तरूण प्राध्यापक म्हणून सर्व मान्यवरांनी  सा. ब. से. संस्था अध्यक्ष डॉ. संघर्ष सावळे यांच्या सत्कारासोबतंच कवयित्री सोनल वाघमारे, आयुष्मान मिलिंद कांबळे, आयुष्मती मेहर, मॅडम अश्विनी, आयुष्मती कविता पडळकर, आ. कांबळे इ. सह सादर निमंत्रित मान्यवरांच्या कुटुंबीयांचा सुध्दा संस्था अध्यक्षांनी सत्कार केला. सदर कार्यक्रम नेपाळ च्या काठमांडू येथील हॉटेल हॉलीडे रिजन्सी च्या वैभवशाली सभागृहात आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रम यशस्वितेसाठी अध्यक्ष तथा त्यांच्या सर्व सन्माननीय सहकारी मित्रांचे योगदान लाभले. या अंतर्राष्ट्रीय सुंदर सोहळ्याची सांगता नंतर नेपाळ येथील विविध प्रेक्षणीय स्थळांसह भ. बुध्दाचे जन्मस्थान लुंबिनी इ. पवित्र ठिकाणी भेटी देऊन करण्यात आली. 

✍️ मोहन चौकेकर


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या