🌟परभणीत दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांना ईडीने केलेल्या अटकेच्या निषेधार्थ इंडिया आघाडीकडून जोरदार निदर्शने....!


🌟लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर केजरीवाल यांना अटक करणे म्हणजे सरकारची दडपशाहीच🌟


 
परभणी (दि.22 मार्च) : परभणी जिल्हाधिकारी कार्यालया समोर आज शुक्रवार दि.२२ मार्च रोजी इंडिया आघाडीकडून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने केलेल्या अटकेच्या निषेधार्थ जोरदार निदर्शने करण्यात आली.

       लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर केजरीवाल यांना अटक करणे म्हणजे सरकारची दडपशाहीच आहे असा आरोप करत आम आदमी पक्ष जिल्हा शाखा व इंडीया आघाडीमधील घटक पक्षांच्या नेतेमंडळींनी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच संविधानिक पदावर असणार्‍या मुख्यमंत्र्याला अटक करून केंद्र सरकारने एक प्रकारे अघोषित आणीबाणी लागू केलेली आहे, असे आंदोलनकर्त्यांनी म्हटले.

या प्रसंगी आपचे सतीश चकोर, सुरेश चौधरी, अर्जून पाटील, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पंढरीनाथ घुले, भाकपचे कॉ. राजन क्षीरसागर, राष्ट्रवादी काँग्रेसचे अतिश गरड, काँग्रेस पक्षाचे बाळासाहेब रेंगे यांच्यासह अन्य पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या