🌟जेष्ठ पत्रकार,समाजसेविका श्रीमती हेमाताई रसाळ यांचा जागतिक महिला दिनानिमित्त सन्मान....!


🌟त्यांनी महिलांचे प्रश्न निवारणासाठी उभारण्यात आलेल्या चळवळीस साथ देवुन संपूर्ण जीवन समाजहितासाठी अर्पित केले🌟


परभणी - जागतिक महिला दिनानिमित्त , महिला उन्नती संस्था (भारत) च्या वतीने संपूर्ण देशात राबविण्यात येत असलेल्या महिला सक्षक्तिकरण अभियानाअंतर्गत, परभणी मधील महिलांचे प्रश्न निवारणासाठी उभारण्यात आलेल्या चळवळीस साथ देवुन संपूर्ण जीवन समाजहितासाठी अर्पित केलेल्या,आदर्श जेष्ठ पत्रकार,दै.गोदातीर समाचार च्या माजी संचालिका श्रीमती हेमाताई रविंद्र रसाळ यांचा,महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष संजय कुमार कोटेचा यांचे मार्गदर्शन खाली इंडियन रिपोर्ट्स असोसिएशन व महिला उन्नती संस्थेच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा श्रीदेवी पाटील यांच्या वतीने ' प्रशस्तीपत्र ' व ' सम्मानपत्र ' मराठवाडा विभागीय अध्यक्ष मदन (बापू) कोल्हे यांच्या हस्ते प्रदान करून गौरव करण्यात आला.या प्रसंगी जेष्ठ साहित्यिक ,' बार्टी 'चे माजी प्रकल्प अधिकारी तथा राज्य पुरस्कार प्राप्त 'आदर्श शिक्षक ' दि.फ.लोंढे, मराठवाडा विभागीय पी.आर.ओ.तथा माजी विशेष कार्यकारी अधिकारी, वैभव ज्वाला चे संपादक देवानंद वाकळे तसेच शैक्षणिक क्षेत्रामध्ये सेवा बजावत पत्रकारितेसोबत सामाजिक व राजकीय, धार्मिक कार्यात सदा अग्रेसर असलेले आदर्श शिक्षक राजकुमार एंगडे, पत्रकार लक्ष्मीकांत बनसोडे यांची उपस्थिती लाभली होती.......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या