🌟नांदेड मध्ये ज्येष्ठ नागरिकांची बुधवार दि.१० मार्च रोजी लक्षवेधी पद यात्रा......!

🌟अशी माहिती डाॅ.हंसराज वैद्य यांनी दिली आहे🌟 

नांदेड(प्रतिनिधी) :- सहयोग ज्येष्ठ नागरिक संघ,ज्येष्ठ नागरिक संघ वजिराबाद नांदेड,ज्येष्ठ नागरिक संघ समन्वय समिती (फेस्काॅम)नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या बुधवार दि.13/3/2024 रोजी ज्येष्ठ नागरिकांच्या प्रलंबित प्रश्नांकडे आणि शेजारिल आंध्र,कर्णाटक,तेलंगाणा राज्या प्रमाणे 3500/-रू प्रति महा मानधन मिळावे म्हणून केंद् व राज्य शासनाचे लक्ष वेधण्या साठी "लक्ष वेधी पद यात्रा" काढण्यात येणार आहे. 

ही पद यात्रा वजिराबाद चौक ते जिल्हाधिकारी कार्यालया पर्यंतच जाईल. ही "लक्ष वेधी पदयात्रा" सकाळी ठिक आकरा वाजता प्रस्थान करेल.या पदयात्रेत नांदेड शहरासह जवळ जवळ किमान पन्नास खेडायातून दहा ते पंधरा हजार गरजवंत ज्येष्ठ नागरिक भाग घेतील.ही "लक्ष वेधी पद यात्रा" तिन ते चार ज्येष्ठ नागरिक हताची साखळी करून अत्यंत शिस्तीने रस्त्याच्या डाव्या बाजूने सावकाश निघेल.या "लक्षवेधी यात्रेत" शहरातील सामाजिक कार्यकर्ते ,सामाजिक संस्था तथा ज्येष्ठ नागरिकांवर प्रेम करणारे बंधू भगीणी सहभागी होणार आहेत.......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या