🌟शेतकऱ्यांची मुलुख मैदानी तोफ शेतकरी नेते रविकांत तुपकरांचं ठरलं : २ एप्रिल रोजी दाखल करणार लोकसभेची उमेदवारी...!


🌟सातगाव येथील 'निर्धार परिवर्तन मेळाव्यात' रविकांत तुपकरांची घोषणा🌟 

🌟अर्ज दाखल करण्यासाठी शेतकरी,कष्टकरी,तरुण व शहरी नागरिकांनी मोठया संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन🌟


बुलढाणा (दि.२४ मार्च):- शेतकऱ्यांचे आग्यामोहळ व शेतकऱ्यांची मुलुख मैदानी तोफ म्हणून ओळखले शेतकरी नेते रविकांत तुपकर हे जनतेच्या आग्रहास्तव बुलढाणा लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून २ एप्रिल रोजी अर्ज दखल करणार असल्याची घोषणा त्यांनी सातगाव (ता.जि.बुलढाणा) येथील निर्धार मेळाव्यात केली. त्याचबरोबर अर्ज दाखल करण्यासाठी शेतकरी, कष्टकरी, तरुण व शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन देखील त्यांनी केले आहे.


                   २२ मार्च रोजी बुलढाणा तालुक्यातील सातगाव येथे झालेल्या निर्धार परिवर्तन सभेनिमित्त शेतकऱ्यांचे आग्यामोहळ व शेतकऱ्यांची मुलुख मैदानी तोफ म्हणून ओळखले जाणारे शेतकरी नेते  रविकांत तुपकरांनी गावकऱ्यांशी संवाद साधला. या सभेला गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत होणाऱ्या परिवर्तनाच्या लढाई सोबत असल्याचा शब्द यावेळी गावकऱ्यांनी रविकांत तुपकरांना दिला. यावेळी सातगाव येथील पुरुषोत्तम पालकर यांनी लोकसभा निवडणुक लढविण्यासाठी ११ हजार १११ रुपये निधी रविकांत तुपकरांना दिला.

          शेतकऱ्यांचे आग्यामोहळ व शेतकऱ्यांची मुलुख मैदानी तोफ म्हणून ओळखले जाणारे शेतकरी नेते  रविकांत तुपकरांनी लोकाग्रहास्तव लोकसभा निवडणुक लढविण्याची घोषणा केल्यानंतर त्यांना जिल्हाभरात मोठा पाठिंबा मिळतांना दिसत आहे. लोक त्यांना निवडणूकीसाठी मोठ्या प्रमाणात लोकवर्गणीही देत आहे. रविकांत तुपकरांनी संपूर्ण जिल्हा पिंजून काढला असून त्यांच्या सभांना लोकं तुफान गर्दी करीत आहेत. सध्या शेतकरी नेते रविकांत तुपकरांची एक लाट निर्माण झाल्याचे चित्र आहे. महायुतीचे उमेदवार व रविकांत तुपकरांमध्ये लढत होण्याची चिन्हे सध्या मतदारसंघात दिसत आहेत. बाकी पक्षाचे उमेदवार ठरण्याआधीच आता रविकांत तुपकरांनी २ एप्रिल रोजी अर्ज दाखल करण्याची घोषणा केली असून अर्ज भरण्यासाठी व परिवर्तनाच्या लढाईत सहभागी होण्यासाठी शेतकरी, कष्टकरी, तरुण व सर्वसामान्य नागरिकांना हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन देखील त्यांनी सातगाव येथे बोलतांना केले आहे.

                यावेळी मंचावर गजानन लांडे-पाटील, तुळशीराम काळे, नंदूभाऊ शिंदे, भगवान देठे, शिवाजीभाऊ पालकर, उत्तमसिंग पालकर, पवन देशमुख, सदाशिव जाधव सर, आकाश माळोदे, दत्तात्रय जेऊघाले, दगडूभाऊ साखरे, गुलाब तायडे, अरुण पन्हाळकर, अरुण नेमाने, पवन बाकरे, अमोल देवकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.  गावातील तरुणांनी या सभेचे उत्कृष्ट नियोजन केले होते...... 

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या