🌟नरेगा अंतर्गत सिंचन विहिरीचे ११५% ऊदिष्ट पुर्ण केल्यामुळे गटविकास अधिकारी यांचा सत्कार...!


🌟गटविकास अधिकारी रविंद्र सोनोने यांचा जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांच्या हस्ते करण्यात आला सत्कार🌟


फुलचंद भगत

वाशिम:-वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर येथील पंचायत समितिचे कर्तव्यदक्ष गटविकास अधिकारी रविंद्र सोनोने यांनी अल्पावधीतच आपल्या कार्यकुशलतेची अनोखी छाप पाडली असुन वरिष्ठांनीही प्रशासकीय कार्याची दखल घेवुन सत्कार करुन सन्मानित केले आहे.नरेगा अंतर्गत सिंचन विहिरीचे ११५% काम पुर्ण केल्याबद्दल त्यांचा वाशिमच्या जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस तसेच लोकप्रिय मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांनी सत्कार करुन सन्मान केला.

              मंगरुळपीर तालुक्यातील पंचायत समितीला प्रभारीचे ग्रहण लागले होते त्यामुळे पाहिजे तसे कामे न होता विकासकामांना खिळ बसली होती.सिंचन विहीरी,घरकुल आदी योजना थंडबस्त्यात होत्या.राजकारणीही गटविकास अधिकार्‍यांना हातचे बाहुल्याप्रमाणे नाचवत असल्याचे एकंदरीत चिञ होते त्यामुळे कामे न होता लोकांना पंचायत समितिच्या चकरा माराव्या लागत होत्या.आर्थीक हितसंबधावाल्याचेच कामे प्राधान्याने करण्याचा सपाटा होता त्यातच गटविकास अधिकारी एस पी पडघान नंतर खमक्या अधिकारी रविंद्र सोनोने यांच्या रुपात लाभल्यामुळे लोककेंद्री प्रशासनाला गती येवून गोरगरीबांचे प्रश्न मार्गी लागायला लागले.पाञ लाभार्थ्यांना विविध शासनाच्या योजनेचा लाभ मिळायला लागला.घरकुलाचेही प्रश्न सोडवलेत.त्यातच मंगरुळपीर तालुक्यात महत्वाचा आणी जिकरीचा असलेल्या सिंचन विहीरीचा प्रश्न आ वासुन ऊभा होता.गटविकास अधिकारी रविंद्र सोनोने यांनी लोकप्रतिनीधी जनता आणी प्रशासन असा समन्वय साधत सिंचन विहिर प्रश्न मार्गी लावत नरेगा अंतर्गतच्या सिंचन विहिरीचे ११५% काम पुर्ण करुन प्रशासनात नावलौकीक मिळवले.अशा लोकहितवादी,प्रशासनात पारदर्शी असणार्‍या कर्तव्यदक्ष गटविकास अधिकारी रविंद सोनोने यांच्या कामाचा सन्मान व्हावा हे गरजेचे वाटल्याने वाशिमच्या जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस तसेच वाशिम जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे,तहसिलदार शितर बंडगर आणी मान्यवरांची सत्कार करुन भेटवस्तु देवुन सोनोने यांना सन्मानित केल्याने सर्वस्तरातुन त्यांचेवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.


प्रतिनीधी:-फुलचंद भगत

मंगरुळपीर/वाशिम

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या