🌟पुर्णेतील गटशिक्षण अधिकाऱ्याचा तुघलकी कारभार : एकाच शिक्षीकेला ९ महिन्यात दोनदा जाचक अटींसह नियुक्ती आदेश....!


🌟वरिष्ठांच्या आदेशाची देखील पायमल्ली : असहाय्य निराधार शिक्षीकेच्या मानसिक/आर्थिक छळाची मालिका थांबणार केव्हा ?🌟 

✍🏻वृत्त विशेष : भाग दुसरा

पुर्णा शहरातील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयात कार्यरत अंशकालीन पदवीधर शिक्षिका श्रीमती सिमा प्रभाकरराव फुटाणे या आपले कर्तव्य बजावण्यासाठी पहाटे लवकरच उठून सेलू येथून देवगिरी एक्स्प्रेसने पुर्णेतील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयात वेळेवर पोहोचून आपले कर्तव्य बजावतात नियमानुसार त्यांच्या कर्तव्यतत्परतेची सर्वात मोठी ओळख म्हणजे त्या शिकवत असलेल्या विज्ञान या विषयाचा निकाल १०० टक्के लागल्याची देखील नोंद आहे. असे असतांना देखील या शाळेतील मुख्याध्यापिका व क्लार्क यांच्याकडून त्याची मानसिक व आर्थिक छळवणूक केली जात असून या छळास गटशिक्षणाधिकारी सुर्यवंशी यांची देखील मुकसंमती असल्याचे निदर्शनास येत आहे.

अंशकालीन पदवीधर शिक्षिका श्रीमती सिमा प्रभाकरराव फुटाणे यांंना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार व अंशकालीन पदवीधर असल्या कारणाने शासकीय नियमाप्रमाणे कायमस्वरूपी नौकरी देणे बंधनकारक असतांनाच देखील तसे नकरता तत्कालीन जिल्हाधिकारी व निवासी उपजिल्हाधिकारी परभणी यांच्याकडे संबंधित शिक्षीकेने लेखी अर्ज केल्यानंतर त्यांच्या कारवाई नुसार मा.आयुक्त मानव विकास आयुक्तालय औरंगाबाद यांचे अध्यक्षतेखाली दि.२०/०९/२०२२ रोजी झालेल्या आढावा बैठकीतील सुचना व मा.शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जिल्हा परिषद परभणी यांचे दि.२२/०९/२०२२ रोजीच्या तोंडीं आदेश नंतर त्यांचा शैक्षणिक पात्रते अनुसार पदवीधर अंशकालीन म्हणून कायम शासकीय नौकरीत समावेश करणे आवश्यक होते किंवा तत्कालीन निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांनी सहाय्यक संचालक जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र परभणी यांना दि.१७/०२/२०२२ रोजी पाठवलेलं पत्र तसेच सहाय्यक आयुक्त कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता परभणी यांच्या पत्र व्यवहारा अनुसार संबंधित अंशकालीन पदवीधर शिक्षिका श्रीमती सिमा प्रभाकरराव फुटाणे यांची तासिका तत्त्वावर गणित या विषयासाठी पुर्णेतील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयात नियुक्ती करणे आवश्यक असतांना गटशिक्षणाधिकारी कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय तालुका व्यवस्थापन समिती पुर्णा व अध्यक्ष तथा तहसीलदार कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय तालुका व्यवस्थापन समिती पुर्णा यांनी दि.२३/०९/२०२२ रोजी नमूद असहाय्य निराधार अंशकालीन पदवीधर शिक्षिका श्रीमती सिमा प्रभाकरराव फुटाणे यांची पुर्णवेळ शिक्षिका तसेच अटी व शर्तीच्या अधीन राहून निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात विज्ञान विषय या पदावर नियुक्ती केली.

अंशकालीन पदवीधर शिक्षिका श्रीमती सिमा प्रभाकरराव फुटाणे यांचे शिक्षण बिएससी/बिड मेथड गणित/विज्ञान असे असून दि.०२ मार्च २०१९ च्या शासन निर्णयानुसार त्यांना पदवीधर अंशकालीन उमेदवारामधून पवित्र पोर्टलच्या माध्यमातून कायम शासकीय नौकरीत समावेश करणे आवश्यक असतांना देखील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयाचे सदस्य सचिव तथा गटशिक्षणाधिकारी सुर्यवंशी व तत्कालीन अध्यक्ष तथा तहसीलदार यांनी प्रथमतः दि.२३ सप्टेंबर २०२२ रोजी आयुक्त मानव विकास आयुक्तालय औरंगाबाद यांचे अध्यक्षतेखालील आढावा बैठकीतील सुचेना दि.२० सप्टेंबर २०२२ तसेच तत्कालीन शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जिल्हा परिषद परभणी यांचे तोंडी आदेश दि.२२ सप्टेंबर २०२२ तसेच शिक्षणाधिकारी कार्यालयाचे पत्र जा.क्र.१०४५ दि.२३ सप्टेंबर २०२२ व याच कार्यालयाचे दुसरे पत्र जा.क्र.७८ दि.१२ ऑक्टोंबर २०२२ नुसार परिश्रमीक मानधन २०,०००/-रुपये (विस हजार रुपयें) तसेच यानंतर २८ जुन २०२३ रोजी जाक्र/केजीबीव्ही/माविका/२०२३-२४/३१ कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय पुर्णा नुसार तत्कालीन शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जिल्हा परिषद परभणी यांचे पत्र जा.क्र.जिपप/विविध/मा-माविका/२०२३/१७४४ आदेश दि.२६ जुन २०२३ नुसार २३,१००/-रुपयें मानधन ठरवून त्यांचा कायमस्वरूपी नोकरीरीत समावेश किंवा तत्कालीन जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार तासिका तत्त्वावर नौकरीत समावेश न करता पुर्णवेळ शिक्षिका या पदावर तात्पुरत्या स्वरूपात नियुक्ती करीत त्यांना दिलेले नियुक्तीपत्र (प्रथम) जाक्र/केजीबीव्ही/माविका//२०२२-२३/६१ दि.२३ सप्टेंबर २०२२ व नियुक्तीपत्र (द्वितीय) जाकर/केजीबीव्ही/माविका/२०२३-२४/८१ कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय पुर्णा या दोन्ही पत्रात अट क्र.१) आपली नियुक्ती ही निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात तासिका तत्त्वावर असुन सदर पदावर जिल्हा कार्यालयाकडून इतर व्यक्ती /कर्मचारी बदलीने आल्यास आपणास सदर पदावरुन तात्काळ कार्यमुक्त करण्यात येईल या बाबत आपला कुठलाही अधिकार अथवा आक्षेप विचारात घेतला जाणार नाही २) सदर विद्यालय/वस्तीगृह हे मुलींचे निवासी विद्यालय वस्तीगृह असून गरज पडल्यास आपणास इतर शिक्षीके प्रमाणे रोटेशन नुसार आळीपाळीने रात्र पाळीची ड्युटी करावी लागेल ३) आपणास प्रस्तुत विद्यालयातील इयत्ता ०६ वी ते इयत्ता १० वी पर्यंतच्या वर्गांना अध्यापण करावे लागेल ४) आपला शालेय व शालेयत्तर कामात सक्रिय सहभाग असणे अनिवार्य असून आपणास इतर शिक्षीके प्रमाणे २५ मुली दत्तक म्हणून देण्यात येतील सदर दत्तक मुलींच्या गुणवत्ता वाढीसाठी व त्यांच्या एकूणच सर्वांगीण विकासासाठी आपणास सर्वतोपरी प्रयत्न करावे लागतील ५) आपणास दररोज विद्यालयाच्या नियोजित वेळी सकाळी ०९-३० ते सायं.०४-३० पर्यंत उपस्थित राहणं बंधनकारक राहील ६) आपणास एकत्रित परिश्रमीक मानधन प्रथमतः २०,०००/- रुपये तर दुसऱ्या वेळी २३,१००/- रुपये या मानधनाच्या आधीन राहून प्रत्यक्ष कामाच्या दिवसाचे मानधन अदा करण्यात येईल विद्यालयाच्या दिर्घकालीन सुट्ट्या (दिवाळी व उन्हाळी) सार्वजनिक सुट्ट्या आठवड्यातील रविवार व अनुपस्पथित दिवसाचे मानधन मिळणार नाही ७) आपल शैक्षणिक कार्य असमाधानकारक वाटल्यास व आपणास दिलेल्या वेळेत शाळेत येत नसल्यास किंवा दिलेल्या वेळेत विद्यालयात थांबून काम पुर्ण करत नसल्यास कोणतीही पुर्व सुचना न देता आपणास कमी करण्यात येईल.८) सदर पदावर भविष्यात आपणास कोणत्याही प्रकारचा कायमस्वरूपी हक्क मागता येणार नाही ९) आपले वेतन/मानधन हे दरमहा करण्यात येईल परंतु आपल्या वेतनासाठी अनुदान उपलब्ध नसेल तर अनुदान उपलब्ध झाल्यानंतर आपले वेतन आपले वेतन अदा करण्यात येईल या होणाऱ्या विलंबाबाबत आपणास कोणतीही तक्रार करता येणार नाही अश्या प्रकारे एका अंशकालीन पदवीधर शिक्षिकेला वेठबिगार अर्थात गुलाम असल्यागत जाचक अटी/तत्वांचा समावेश करीत या असहाय्य निराधार अंशकालीन पदवीधर शिक्षीकेची जाणीवपूर्वक आर्थिक मानसिक छळवणूक होत असतांना अनेक तक्रारीं नंतर देखील तक्रारींची जिल्हाधिकारी जिल्हा शिक्षणाधिकारी दखल घेत नसल्यामुळे सदरील शिक्षीकेचे मानसिक खच्चीकरण करुन तीला पळवून लावण्याचा कुटील डाव रचल्या जात असून सदरील अंशकालीन पदवीधर शिक्षीका सेलू येथील असल्याने या शिक्षीकेला नियमानुसार तिच्या शैक्षणिक पात्रतेनुसार कायम नौकरी देऊन तिची सेलूतच नियुक्ती करणे आवश्यक असतांना तिला पुर्णा येथील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयात तात्पुरत्या स्वरूपाची नियुक्ती देऊन तिची मानसिक/आर्थिक छळवणूक तर केला जातच आहे याशिवाय तिला जाणीवपूर्वक वेळेवर निधी उपलब्ध असतांना देखील तीच्या हक्काचा पगार तिला वेळेवर न देता तीचे मानसिक खच्चीकरण देखील केले जात असल्याचे पाहावयास मिळत आहे......


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या