🌟पुर्णा तालुक्यातील पुर्णा-ताडकळस राज्य मार्गावर उषाने भरलेल्या ट्रॅक्टरच्या धडकेत युवकाचा दुर्दैवी मृत्यू.....!


🌟लघुशंकेसाठी रस्त्याच्या कडेला उभा टाकलेल्या विजय जाधव नामक युवकाला मद्यधुंद ट्रॅक्टर चालकाने चिरडले🌟

पुर्णा (दि.१६ मार्च) - पुर्णा तालुक्यातील पुर्णा-ताडकळस राज्य मार्गावरील कानडखेड फाट्या जवळील बालाजी विक्रम कदम यांच्या आखाड्यालगत लघुशंकेसाठी रस्त्याच्या कडेला उभ्या टाकलेल्या अंदाजे २७ वर्षीय विजय लिंबाजी जाधव नामक युवकास मद्यधुंद ट्रॅक्टर चालकाने चिरडल्याची दुर्दैवी घटना काल शुक्रवार दि.१४ मार्च २०२४ रोजी रात्री १०-३० ते ११-०० वाजेच्या सुमारास घडली असून या घटनेत जखमी युवकाचा मृत्यू झाला आहे.

या घटने संदर्भात सविस्तर वृत्त असे की पुर्णा-ताडकळस मार्गावरुन मोटार सायकलवर पुर्णेकडे येत असतांना लघुशंका करण्यासाठी मोटार सायकल थांबवून लघुशंका करण्यासाठी थांबलेल्या पुर्णेतील विजय जाधव यांना उसाने भरलेल्या मद्यधुंद ट्रॅक्टर चालकाने सरळ अंगावर ट्रॅक्टर घालून चिरडले या घटनेत गंभीर जखमी झालेल्या विजयला रुग्णालयात घेऊन जाण्यापूर्वीच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला दरम्यान या घटनेतील ट्रॅक्टर घटनास्थळावरच उभे असून ट्रॅक्टर चालकाला पुर्णा पोलीसांनी ताब्यात घेतले असल्याचे समजते मयत विजय जाधव यांच्या पार्थिवावर आज शनिवार दि.१५ मार्च २०२४ रोजी सकाळी १०-०० वाजेच्या सुमारास येथील पुर्णा नदीकाठावरील हिंदू स्मशानभूमीत अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.....


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या