🌟नांदेड जिल्ह्यातील नागरिकांनी उपवासाला भगरीचे सेवन करतांना काळजी घ्यावी.....!

 


🌟अन्न व औषध प्रशासनाचे नागरिकांना आवाहन🌟 

उपवासाला मोठ्या प्रमाणात भगरीचे सेवन केले जाते. भगर खाल्ल्यामुळे अन्न विषबाधा झाल्याच्या अनेक घटना महाराष्ट्रात वारंवार घडत आहेत. त्यामूळे भगर खाताना  काळजी घ्यावी. 

भगरीवर मोठ्या प्रमाणात अस्पारीगिलस  प्रजातीच्या बूरशीचा प्रादुर्भाव होतो. ज्या मूळे फ्युमिगाक्लेविन  यासारखी विषद्रव्ये(टॉक्जीन) तयार होतात.  ऑक्टोबर महीन्यातील तापमान आणि आर्द्रता बूरशीच्या वाढीसाठी अनूकूल असते. अशी बूरशीचा प्रादुर्भाव झालेली भगर खाण्यात आल्यास अन्न विषबाधा होऊ शकते.

*भगर खाताना काय काळजी घ्यावी*

 1. बाजारातून भगर आणल्या नंतर ती निवडून स्वच्छ करा. शक्यतोवर पाकीटबंद भगर घ्या. ब्रॅड नाव नसलेली  किंवा लेबल नसलेली भगर पाकीटे व सूटी भगर घेऊ नका. भगर घेतांना पाकीटावरचा पॅकींग दिनांक व अंतिम वापर दिनांक तपासा.

 2. भगर साठवताना ती स्वच्छ कोरड्या ठीकाणी, व्यवस्थित झाकणबंद डब्यात ठेवा, जेणेकरुन वातावरणातील ओलाव्यामूळे बूरशीची वाढ होणार नाही.जास्त दिवस भगर साठवू नका. जास्त दिवस साठवलेली भगर खाऊ नका. 

3. शक्यतोवर भगरीचे पीठ विकत आणू नका. भगरीच्या पिठामध्ये वातावरणातील ओलावा शोषून घेण्याची क्षमता आधिक असते. त्यामूळे पिठाला बूरशीची लागण होण्याची शक्यता जास्त असते. भगरीच्या दशम्या किंवा भाकरी खाण्याऐवजी  खिचडी खावी.

4. भगरीचे पीठ आवश्यक असेल तेवढेच दळून घ्या. जास्त दिवस पीठ साठवू नका. बाहेरुन दळून आणण्यापेक्षा घरीच  दळा.

 5. भगर आणि शेंगदाणे हे आधिक प्रथिनयुक्त पदार्थ आहेत. दोन तिन दिवस सलग उपवास असतांना या पदार्थांचे सेवन ॲसिडीटी वाढण्यास कारणीभूत ठरते. त्यामुळे उलटी, मळमळ व पोटाचे त्रास होतात. या पदार्थांचे सेवन पचनशक्ती नूसार मर्यादेतच करावे.भगरीचे सेवन करतांना या गोष्टी लक्षात ठेवा.म्हणजे संभाव्य अपाय टाळता येईल.

*भगर विक्रेत्यांसाठी सुचना*

1.  विक्रेत्यांनी पॅकबंद भगरचीच विक्री करावी. भगर खरेदी करतांना घाऊक विक्रेत्याकडून पावती घ्यावी. 

2. भगरीचे पॅकेट, पोत्यावर उत्पादकांचा पत्ता,परवाना क्र., पॅकींग दिनांक, अंतिम वापर दिनांक असल्याची खात्री करून घ्या. 

3. मुदत बाह्य भगर किंवा भगर पिठाची विक्री करु नये. 

4. सुटी भगर व खूले भगर पिठ शक्यतो विक्रीसाठी ठेऊ नये. 

अन्न व औषध प्रशासनाचे वतीने भगर विक्री करणाऱ्या दुकानांची तपासणी करण्यात येत आहे. नियमाचे उल्लंघन करणाऱ्या विक्रेत्यांवर अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 अंतर्गत कारवाई घेण्यात येईल......



-  अन्न व औषध प्रशासन , नांदेड.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या