🌟पुर्णा तालुक्यातील पुर्णा-नांदेड/पुर्णा-ताडकळस राज्यमार्ग बनले मृत्यूचे महामार्ग ? या मार्गांवरील अवैध दारू विक्री कारणीभूत...!


🌟परभणी जिल्हा उत्पादन शुल्क विभाग कुंभकर्णी झोपेत ? खानावळींच्या नावावर चालणाऱ्या धाब्यांतून देशी/विदेशी दारू विक्री🌟

परभणी/पुर्णा (विशेष वृत्त) :- परभणी जिल्ह्यातील पुर्णा तालुक्यातल्या पुर्णा-चुडावा-नांदेड तसेच पुर्णा-ताडकळस-सिंगनापूर या राज्यमार्गांवर अपघातांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढल्याचे निदर्शनास येत असून दर चार/आठ दिवसाला एखादं दोन अपघात होतच असल्याने या अपघातांची मालिका शेवटी थांबणार तरी केव्हा ? असा उपस्थित होत असतांना व घपघातांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर स्वरूप धारण करीत असतांना देखील प्रशासकीय पातळीवर या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी यत्किंचितही प्रयत्न केल्या जात नसल्याचे निदर्शनास येत असून मागील २०२२/२३ या वर्षासह जानेवारी २०२४ ते मार्च २०२४ या तीन महिन्यांच्या कालावधीत झालेल्या अपघातामुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागले तर अनेकांवर आपल्या शरीराचे अवयव निकामी करुन घेण्याची वेळ आली असून या मार्गावरील अपघातांमध्ये कोणाला आपला बाप... कुणाला आपला कर्ताधर्ता मुलगा... कुणाला आपला पती.....तर कुणाला आपला भाऊ गमवावा लागला म्हणतात ना 'ज्याच जळत त्याला कळत' अपघातात मृत्यू मुखी पडलेल्या व्यक्तीच्या घराची काय दुर्दशा होते त्या उध्वस्त घरातील लोकांनाच त्याच्या हृदयविदारक वेदना कळतात.

पुर्णा तालुक्यातल्या पुर्णा-चुडावा-नांदेड तसेच पुर्णा-ताडकळस-सिंगनापूर या राज्यमार्गांवर अपघातांचे प्रमुख कारण म्हणजे वाहन चालकांचा बेजबाबदारपणा व या राज्यमार्गांवर खानावळींच्या नावावर चालणाऱ्या धाब्यांतून मोठ्या प्रमाणात होणारी बेकायदेशीर देशी/विदेशी दारूची विक्रीच असल्याचे स्पष्ट होत आहे पोलीस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या मार्गावरील अनेक अपघातातील वाहन चालक मद्यधुंद नशेत बेजबाबदारपणे वाहन चालवताना आढळून आले संबंधित राज्य मार्गावरुन गौण खनिज वाळू/दगड खडी/मातीसह मुरुमाने तसेच विटांनी भरलेली जड वाहतूक करणारी वाहन मोठ्या प्रमाणावर चालतात सदरील वाहनांचे चालक एकतर वाहतूकीच्या नियमांचे कुठलेही ज्ञान नसलेले तर असतातच त्याहीपेक्षा गंभीर बाब म्हणजे ते मद्यधुंद अवस्थेत वाहनं चालवतांना आढळून येतात बळीराजा साखर कारखान्यात उसाची आवक मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे ट्रॅक्टर चालक एकाच हेडला दोन दोन ट्राल्या लावून क्षमतेपेक्षा जास्त उसाचा भरणा करुन वाहतूक करीत असल्याचे निदर्शनास येत आहे.

पुर्णा-ताडकळस राज्यमार्गावर शासकीय ग्रामीण रुग्णालयालगत व पंचायत समिती कार्यालय, सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालय,न्यायालय तहसिल कार्यालय आदी कार्यालयांच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या नियमबाह्य परंतु राज्य उत्पादन शुल्क विभागाने 'गांधी प्रेमातून' नियमात बसवून दिलेल्या अधिकृत परवानगी नुसार चालत असलेल्या देशी दारू अड्डा व याच मार्गावर खानांवळीच्या नावावर चालणाऱ्या धाब्यांतून सहज उपलब्ध होणाऱ्या बेकायदेशीर देशी/विदेशी दारूचे यथेच्छ सेवन करुन वाहन चालक वाहन चालवत असल्या मुळेच गंभीर अपघात घडतांना पाहावयास मिळत आहे असाच गंभीर अपघात दि.१४ मार्च २०२४ रोजी रात्री १०-३० ते ११-०० वाजेच्या सुमारास पुर्णा-ताडकळस राज्यमार्गावर घडला रस्त्याच्या बाजूला लघुशंकेसाठी उभा टाकलेल्या २७ वर्षीय विजय लिंबाजी जाधव या युवकाला कुठलाही नंबर नसलेल्या टँकरच्या मद्यधुंद अवस्थेतील टँकर चालकाने चिरडल्यामुळे या युवकाचा जागेवरच मृत्यू झाल्याची भयंकर हृदयविदारक घटना घडली या घटनेत मृत्यू पावलेल्या युवकांच्या मृत्यूस सर्वस्वी परभणी जिल्हा राज्य उत्पादन शुल्क विभाग व उपप्रादेशिक परिवहन विभाग परभणी या विभागातील अधिकारी/कर्मचाऱ्यांचा बेजबाबदार कारभारच असल्याचे स्पष्ट होत आहे.

पुर्णा तालुक्यातील राज्यमार्गांवरील धाब्यांतून मोठ्या प्रमाणात बेकायदेशीररित्या खुलेआम देशी/विदेशी दारू विक्री होत असतांना परभणी जिल्हा राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी/कर्मचारी मुग गिळून गप्प असल्यामुळे शंकेची पाल चुकचुकतांना दिसत आहे तर जिल्ह्यात असंख्य कालबाह्य झालेली तसेच कुठल्याही प्रकारच्या नोंदी नसलेली नंबरप्लेट अदृश्य वाहन बेकायदेशीर वाहन विदाऊट लायसन्स धारक चालकांकडून चालवली जात असतांना परभणी जिल्हा उपप्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी/कर्मचारी आपल्या कर्तव्याशी दगलबाजी तर करीत नाही ना ? असा देखील प्रश्न उपस्थित होणार नाही तर नवलच.....


 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या