🌟परभणी जिल्ह्यातील सकल मराठा समाज उद्या आयोजित बैठकीद्वारे निर्णय घेणार....!


🌟 सदरील बैठक अंतरवली सराटीत मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी घेतलेल्या भूमिकेच्या समर्थनात आहे🌟

परभणी,दि.27(प्रतिनिधी) : परभणी जिल्ह्यातील सकल मराठा समाजाच्या वतीने परभणी येथील एमआयडीसी परिसरातील व्यंकटेश मंगल कार्यालयात उद्या गुरुवार दि.२८ मार्च रोजी सकाळी ११-०० वाजता महत्त्वाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

या बैठकीचा विषय हा अंतरवली सराटी येथे मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी जी काही भूमिका घेतली आहे, त्या भूमिकेच्या संदर्भात परभणी जिल्ह्यातील सर्व समाज बांधवांची भूमिका काय आहे, तसेच परभणी लोकसभा निवडणुकीत कोणता निर्णय घ्यायचा, त्याचबरोबर येणारी निवडणूक सकल मराठा समाजाकडून कोण लढवणार यांसह अनेक विषयांवर सविस्तर चर्चा व निर्णय घेण्यासाठी ही बैठक नियोजित  केली आहे. त्यामुळे सर्व समाज बांधवांनी मराठा समाजाच्या हिताचा योग्य निर्णय घेता यावा व त्या निर्णयात सर्वांचे मत हे अत्यंत महत्त्वाचे असून ते मांडण्यासाठी सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन सकल मराठा समाज परभणी जिल्ह्याच्या वतीने करण्यात आले आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या