🌟हिंगोली जिल्हा स्थानिक शाखेच्या पथकाने गोरगरिबांच्या तोंडचा घास पळवणाऱ्या स्वस्त धान्य तस्करांच्या आवळल्या मुसक्या...!


🌟शासकीय स्वस्त धान्य प्रणालीतील काळ्या बाजारात विक्रीसाठी जाणारा गहु,तांदुळाचा साठा वाहनासह घेतला ताब्यात🌟

 हिंगोली : हिंगोली जिल्हा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आज सोमवार दि.०४ मार्च २०२४ रोजी सेनगाव पोलीस स्थानकाच्या हद्दीत धडसी कारवाई करीत शासकीय स्वस्त धान्य प्रणालीतील  काळ्या बाजारात विक्रीसाठी टेंम्पोतून जाणारा गहू/तांदळाचा धान्यसाठा ताब्यात घेण्याची धाडसी कारवाई केली.

या घटने संदर्भात सविस्तर वृत्त असे की स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी सेनगाव पोलीस स्थानकाच्या हद्दीतून काळ्या बाजारात विक्रीसाठी टेंम्पोतून जात असलेला शासकीय स्वस्त धान्यातील गहू आणि तांदळाचा साठा आज दि.०४ मार्च रोजी ताब्यात घेतला असून या प्रकरणी आरोपी शेख जावेद शेख निजामुद्दीन राहणार रिसोड,आयुब राहणार नरसी, सलीम अली राहणार रिसोड यांच्या विरोधात कलम ३,७ ई.सी ॲक्ट प्रमाणे  कार्यवाही करण्यात आली .

 राज्य व केंद्र शासनाच्या वतीने गोरगरीब शेतकरी शेतमजूर रोजमंजूर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक तसेच दिव्यांगासाठी शासकीय स्वस्त धान्य प्रणाली अंतर्गत शिधापत्रिकांद्वारे काहींना अल्पदरात तर काहींना मोफत पुरवठा विभागाच्या माध्यमातून वाटपासाठी वितरीत केलेल्या गहू तांदळाचा साठा शासकीय स्वस्त धान्य दुकानदार व राशन तस्कर यांच्या संगनमताने नियमबाह्य पद्धतीने काळ्या बाजारात विक्री करिता जात असताना स्थानिक गुन्हे शाखा हिंगोलीच्या पथकाने पथकाने कार्यवाही करूण मुद्देमालासह आरोपींना अटक केली 

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केलेल्या कारवाईत एक टेम्पो किंमत अंदाजे किंमत १,४४२२४/-रुपये व गहू व ताुंदूळ ४,०००००/-रुपये असा ५४४२२४/-रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदरील कार्यवाही हिंगोली पोलिस अधिक्षक जी.श्रीधर व अप्पर पोलीस अधिक्षका अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विकास पाटील,पोलीस उपनिरिक्षक विठूबोने,पोह आडे, पोह / चव्हाण, पोशी /गुंजकर, पोशी /सौर, पोशी  खंडागळे, चापोह  जावेद यांनी कार्यवाही केली.....


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या