🌟परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचा २५ वा दीक्षांत समारंभ उत्‍साहात संपन्‍न....!


🌟दीक्षांत समारंभाच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाराष्ट्र राज्‍याचे माननीय राज्यपाल श्री रमेश बैस यांनी भूषविले🌟


परभणी (दि.१९ मार्च) : वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचा २५ वा दीक्षांत समारंभ उत्‍साहात संपन्‍न झाला. दीक्षांत समारंभाच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाराष्ट्र राज्‍याचे माननीय राज्यपाल श्री रमेश बैस यांनी भूषविले समारंभात माननीय राज्यपाल यांनी विद्यापीठातील विविध विद्याशाखेतील एकुण ११००२ स्नांतकांना विविध पदवी, पदव्युत्तर पदवी व आचार्य पदवीने अनुग्रहीत केले. अध्यक्षीय भाषणात माननीय राज्यपाल म्‍हणाले की, विद्यापीठाने संशोधनाच्‍या आधारे हवामान बदलास अनुरूप पीक पध्‍दती विकसित करावी. तसेच कृ‍षी पदवीधरांनी कृषि विकासात आपले योगदान देण्‍याचा सल्‍ला त्‍यांनी दिला.


भारतीय कृषी शास्त्रज्ञ निवड मंडळाचे अध्यक्ष डॉ. संजय कुमार यांनी दीक्षांत अभिभाषण केले. स्वागतपर भाषणात कुलगुरू डॉ. इन्द्र मणि यांनी विद्यापीठाचा अहवाल सादर करतांना म्हणाले की, विद्यापीठ शेतकरी केंद्रीत विस्‍तार कार्य, विद्यार्थी केंद्रीत शिक्षण, नवाचार केंद्रीत संशोधन आणि कर्मचारी केंद्रीत प्रशासन हा दृष्‍टीकोण ठेऊन कार्य करित आहे......

****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या