🌟नामनिर्देशन पत्र दाखल करुन घेण्याची जिल्हा प्रशासनाची रंगीत तालीम पूर्ण....!


🌟नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी पाच व्यक्तींनाच प्रवेश अर्ज दाखल करतांना तीन वाहनाना परवानगी🌟

परभणी (दि.27 मार्च) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने 17-परभणी लोकसभा मतदार संघाकरीता अधिसूचना जाहिर करण्यात आली आहे. त्यानुसार आजपासून उमेदवारांना आपले नामनिर्देशन पत्र गुरुवार, दिनांक 04 एप्रिल, 2024 पर्यंत कोणत्याही दिवशी (सार्वजनीक सुट्टी व्यतिरीक्त) सकाळी 11.00 ते दूपारी 3.00 वाजेपर्यंत निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, परभणी येथे दाखल करता येणार आहे. नामनिर्देशन पत्र दाखल करुन घेण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आज यशस्वीरित्या रंगीत तालीम पूर्ण करण्यात आली.

निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार नामनिर्देशन दाखल करण्यासाठी उमेदवारांना पुढील नियमांचे पालक करणे आवश्यक असणार आहे. यामध्ये नामनिर्देशन पत्र दाखल करतांना निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कक्षात उमेदवार व इतर चार अशा एकुण पाच व्यक्तींनाच प्रवेश करता येईल. पाच पेक्षा जास्त व्यक्तींना परिसरामध्ये प्रवेश मिळणार नाही. निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या आदेशानुसार उमेदवरांना आपला अर्ज दाखल करतांना मर्यादीत वाहनांचा वापर (तीन वाहनाना परवानगी) करावा. सदर वाहने जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या कार्यालयापासून 100 मिटर अंतरावर पार्क करावे. येथील आंदोलन मैदानात या वाहनासाठी पार्कींगची व्यवस्था करण्यात आली आहे. तर कार्यालयीन कामकाजाकरीता कार्यालयात येणाऱ्या व्यक्तींच्या वाहनाच्या पार्किंग मध्ये बदल करण्यात आला आहे. निवडणूक नामनिर्देशन पत्र दाखल करुन घेण्याची सर्व प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस उपअधिक्षक यांच्यावर पोलीस बंदोबस्ताची जबाबदारी राहणार असल्याची माहिती जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी रघुनाथ गावडे यांनी दिली.

यावेळी संपूर्ण नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या प्रक्रीयेतील कायदेशीर बाबी व अनुषंगीक तरतुदींची माहिती प्रक्रियेतील सर्व संबंधीत कार्यरत अधिकारी-कर्मचारी यांना अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे यांनी देवून हि रंगीत तालीम पुर्ण करुन घेतली......


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या