🌟नांदेड पोलीसांची धाडसी कारवाई : बनावट तंबाखू व तंबाखूजन्य साहित्य केले जप्त....!


🌟पोलीसांनी केलेल्या धाडसी कारवाईत 19,75,200/- रुपयांचा मुद्देमाल जप्त🌟 

नांदेड (दि.३० मार्च) - नांदेड जिल्ह्याचे जिल्हा पोलिस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे,अप्पर पोलोस अधिक्षक अबिनाश कुमार यांनी आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने अवैध धंद्यावर धडक कार्यवाही करण्या संदर्भात शहरासह संपूर्ण जिल्ह्यातील पोलिस अधिकारी/कर्मचाऱ्यांना सक्त आदेश दिले होते त्याअनुषंगाने उपविभाग इतवारा येथील गुन्हेशोध पथकाने काल शुक्रवार दि.२९ मार्च २०२४ रोजी शहरातील नांदेड ग्रामिण पोलीस स्थानकाच्या हाद्दीतील मिल्लतनगर एम.जी.आर गार्डन येथे मोठ्या प्रमाणात बनावटी सुर्यछाप जर्दा साठवून ठेवल्याबद्दल मिळालेल्या गोपनिय माहीतीवरुन मिल्लतनगर येथे जावून रेड टाकली असता तेथे बनावट व्ही.एच.पटेल आणि कंपनी चाळीसगाव जिल्हा जळगांव या कंपनीच्या टोटयावरील हबेहुब दिसनारे लोगो,त्यावरील चिन्हे, आकृत्या नावे वापरुन आरोपीने स्वःताचे आर्थिक फायद्यासाठी बनावट सुर्य छाप टोटा तंबाखू भरण्यासाठी पुंगठ्या, त्यासाठी लागणारे प्रिन्टेड कागद,बनावट सुर्य छाप टोट्याचा पुडया तसेच पॅकींग करण्यासाठी लागणारे प्रिन्टेड कागद,सुर्य मुखाचे चिन्हे असणारे प्रिंन्टेड कागद बनावट सुर्य छाप टोटाचे पेंकींग केलेले टोट्याचे पूडे व त्यासाठी वापरण्याचा नकली तंबाखू,तसेच गुटखा,बिडी यांचे प्रिंन्टेट कागद व पॉलीथीन असा एकुन 19,75,200/-रुपयाचा मुद्देमाल मिळून आला.

 यावरुन पोलिस स्टेशन नांदेड येथे गुन्हा क्रमांक 258/ 2024 कलम 328,468,471,34 भादवी प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला असुन पुढील तपास इतवारा पोलीस स्थानकाचे पोलीस उपनिरीक्षक रमेश गायकवाड हे करीत असून सदर कार्यवाही जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अप्पर पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार यांचे मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस अधिकारी उपविभाग इतवारा सुशीलकुमार नायक तसेच इतवारा गुन्हे शोध पथकातील पोलीस अंमलदार पोना/अर्जुन मुंडे, पोकॉ/ चंद्रकांत स्वामी, संतोष बेल्लुरोड, श्रीराम दासरे, सायबर शाखेचे राजु सिटीकर यांनी केली असुन त्यांचे वरिष्ठांनी कौतुक केले आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या