🌟पुर्णा तहसील कार्यालयात जागतिक महिला दिन अत्यंत उत्साहात साजरा.....!

(जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून तहसिलदार बोरीकर यांनी अव्वल कारकून प्रियंका जोंधळे यांना एकदिवसीय तहसीलदार पदाचा पदभार देऊन आगळ्यावेगळ्या पद्धतीने महिला दिन साजरा केला)

🌟महिला दिनानिमित्त महिलांकरिता वेगवेगळे उपक्रम राबविण्यात आले🌟

पुर्णा (दि.१३ मार्च) - पुर्णेचे तहसीलदार माधव बोथीकर यांच्या आगळ्यावेगळ्या संकल्पनेतून आज बुधवार दि.१३ मार्च २०२३ रोजी जागतिक महिला दिन अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला तहसिलदार बोथीकर यांनी तहसिल कार्यालयातील संपूर्ण एक दिवसीय पदभारासह दैनंदिन व्यवहार हा तहसिल कार्यालयात कार्यरत महिलांकडे देऊन जागतिक महिला दिन अनोख्या पद्धतीने साजरा करीत सर्व महिला कर्मचाऱ्यांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या तर या महिला दिनानिमित्त वेगवेगळे महिलांकरिता उपक्रम राबविण्यात आले.

या उपक्रमामध्ये पूर्णा तहसील येथे अव्वल कारकून पदावर रुजू असलेल्या प्रियंका जोंधळे यांना एकदिवसीय पूर्णा तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी या पदावर रुजू करून त्यांचा महिला दिनानिमित्त यथोचित सन्मान करण्यात आला तर उज्वला पुल्लेवार ह्या महसूल सहाय्यक रुजू आहेत तर त्यांना नायब तहसीलदार महसूल १ या एक दिवसीय पदावर रुजू करून त्यांचा सन्मान करण्यात आला तर श्रीमती ज्योती पगारे नायब तहसीलदार निवडणूक विभाग, पल्लवी उबाळे अव्वल कारखान महसूल, राधा चांदणे अव्वल कारखून जमाबंदी एक व दोन, विशाखा वडमारे अव्वल कारकून, विजयलक्ष्मी बळवंत महसूल सहाय्यक निवडणूक, सुरेखा देशमाने महसूल सहाय्यक, मेहराज पठाण महसूल सहाय्यक जमाबंदी दोन, राजश्री देसाई महसूल सहाय्यक आस्थापना, पूजा धरणकर महसूल सहाय्यक, सुनिता चेटले महसूल सहाय्यक गौणखनिज, आरती स्वामी शिपाई नायब तहसीलदार यांचे दालन, वंदना एंगडे महसूल सहाय्यक निवडणूक, राखी भावे शिपाई तहसील यांचे दालन, अर्चना सुरवसे शिपाई नायब तहसीलदार महसूल -१, शेजल भगत शिपाई नायब तहसीलदार महसूल -२ यांचे दालन अशा पद्धतीने सर्व महिलांना वेगवेगळ्या पदावर एक दिवसीय रुजू करून महिलांचा यथोचित सत्कार केला तर याप्रसंगी सर्व महिलांना एक छोटीशी ट्रिप म्हणून पूर्णा येथील बळीराजा साखर कारखाना येथील सहल काढून त्यांना साखर कशा पद्धतीने होते हेही दाखवण्यात आले तर दुपारच्यावेळी सुमधुर असे भोजन ही देण्यात आले तर सायंकाळी शेवटच्या सत्रामध्ये सर्व महिलांना पाणीपुरी देऊन अशा विविध उपक्रम राबवून या सर्व महिलांचा जागतिक महिला दिनानिमित्त यथोचित सन्मान करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली 

या कार्यक्रमासाठी दोन दिवसापासून अथक परिश्रम घेत असलेले पूर्णा तहसीलचे तहसीलदार मा. माधव बोथीकर साहेब, मा.प्रशांत थारकर साहेब नायब तहसीलदार, मा. मस्के साहेब नायब तहसीलदार, शिंदे साहेब नायब तहसीलदार, शिंदे साहेब मंडळ अधिकारी, वरपटे साहेब मंडळ अधिकारी, काकडे साहेब मंडळ अधिकारी, रासवे साहेब तलाठी, शिवप्रसाद देवणे कोतवाल,साईनाथ दाढे कोतवाल, मोरे कोतवाल, वसमतकर कोतवाल ,सातपुते कोतवाल, या सर्वांनी परिश्रम घेतले तर पूर्णा तहसीलचे तहसीलदार माधवजी बोथीकर साहेब यांच्या संकल्पनेतून एक दिवसीय सर्व महिलांवर पदभार देऊन जागतिक महिला दिन साजरा करण्याचा त्यांचा मानस हा पुर्ण पणे यशस्वीरीत्या पार पडला

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या