🌟ज्येष्ठ नेत्या सौ शांताबाई जोगदंड यांचा जागतिक महिला दिनानिमित्त विशेष गौरव....!


🌟महिला उन्नती संस्थे तर्फे मराठवाडा विभाग अध्यक्ष मदन (बापू ) कोल्हे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान🌟

परभणी - परभणी येथील सामाजिक व धार्मिक तसेच राजकीय क्षेत्रामधील सक्रिय ज्येष्ठ नेत्या सौ.शांताबाई  श्रीधरराव जोगदंड यांच्या कार्याची दखल घेऊन जागतिक महिला दिनानिमित्त,राष्ट्रीय स्तरावर कार्यरत असलेल्या,महिला उन्नती संस्थे तर्फ मराठवाडा विभाग अध्यक्ष मदन (बापू ) कोल्हे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करुन सन्मान करुन त्यांचा गौरव केला आहे.


 केंद्र सरकारच्या अखत्यारीतील  नीती आयोग अंतर्गत, महिला उन्नती संस्थे तर्फे जागतिक महिला दिनानिमित्त राबविण्यात आलेल्या  'महिला सशक्तिकरण अभियाना 'अंतर्गत , शांताबाई जोगदंड यांना ' उत्कृष्ट सामाजिक कार्यकर्त्या  'म्हणून प्रशस्तीपत्र व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान केला आहे.

परभणी येथील आंबेडकर नगर मधील कमला नेहरू मुलींचे वस्तीगृहामध्ये सामाजिक कार्यकर्ते श्रीधर जोगदंड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात प्रथम महिला उन्नती संस्थेच्या मराठवाडा विभागाचे अध्यक्ष मदन (बापू)कोल्हे यांनी शांताबाई जोगदंड यांचा पुरस्कार प्रशस्तीपत्र, पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. कार्यक्रमाचे संचालन मुकुंद नंद यांनी केले.

यावेळी गंगाधर शिंदे,प्रभावती शिंदे,प्रमोद जोगदंड,विनोद जोगदंड,संगीता जोगदंड,अस्मिता जोगदंड तसेच वस्तीगृहातील विद्यार्थिनींची उपस्थिती लाभली होती.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या