🌟नांदेड येथील सचखंड गुरुद्वारातील होला मोहल्ला या धार्मिक उत्सवात पन्नास ते साठ हजार सिख यात्रेकरूंनी लावली हजेरी...!


🌟सचखंड गुरुद्वारा बोर्डाच्या नियोजनबद्ध व्यवस्थापन व कर्मचाऱ्यांकडून पुरवण्यात आलेल्या सुविधांनी भारावून गेले तिर्थयात्रीं🌟


नांदेड (दि.२७ मार्च) -  सिख धर्मियांची दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व सिख धर्माच्या पाच पवित्र तख्तांपैकी एक तख्त असलेल्या नांदेड येथील श्री हुजर साहीब अबचल नगर गुरुद्वारा येथे प्रतिवर्षाप्रमाणे याहीवर्षी होळी सनाच्या पार्श्वभूमीवर दि.२३ मार्च ते दि.२६ मार्च २०२४ दरम्यान सचखंड गुरुद्वारा बोर्डाचे प्रशासक सरदार विजय सतबीरसिंघ यांच्या मार्गदर्शनाखाली विविध धार्मिक कार्यक्रमांसह दि.२६ मार्च २०२४ रोजी आयोजित प्रतिकात्मक हल्ला बोल 'होला मोहल्ला' या पारंपरिक धार्मिक उत्सवात सहभाग नोंदवण्यासाठी यावर्षी जवळपास ५० ते ६० हजार तिर्थयात्रेकरूंनी सहभाग नोंदवला होता.


या होला मोहल्ला कार्यक्रमासाठी आलेल्या तिर्थयात्रेकरुत राज्यातील मुबई औरंगाबाद नागपुर अमरावतीसह हैदराबाद रायपुर छत्तीसगड बेंगलोर पंजाब दिल्ली हरियाणा उत्तर प्रदेश गुजरातसह कॅनडा अमेरिका लंदन येथील तिर्थयात्रेकरूंनी देखील सहभाग नोंदवला होता यावेळी सचखंड गुरुद्वारा बोर्ड प्रशासनाने सचखंड परिसरातील भाई दयासिंघजी यात्री निवास,मोनी बाबाजी यात्री निवास, पंजाब भवन यात्री निवास, गुरु अंगददेवजी यात्री निवास,एजीपीसी रामडीया,गुरु रामदास यात्री निवाससह यात्रेकरुंना राहण्यासाठी कुठल्याही प्रकारचा त्रास होता कामा नये याकरिता प्रथमच गुरू गोविंदसिंघजी मेमोरियल हॉस्पिटलची इमारत तसेच गुरू ग्रंथ साहिबजी भवनच्या सुसज्ज हॉलमध्ये मोफत राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती परंतु यात्रेकरुंची संख्या जास्त असल्यामुळे गुरुद्वारा बोर्डाचे प्रभारी अधिक्षक आर.डी.सिंघ यांच्या आदेशाने स.रविंदरसिंघ कपूर व स.जयमलसिंघ धिल्लन यांनी सिबीएससी स्कुलचा काही भाग तसेच हॉस्टेल देखील खाली करुन यात्रेकरूंच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे 'धर्म प्रचार' केंद्रातील विद्यार्थ्यांनी त्यांच्या राहण्याच्या जागेत  तिर्थयात्रेकरूंच्या राहण्याची व्यवस्था केली.

या ऐतिहासिक होला मोहल्ला या धार्मिक कार्यक्रमात सहभाग नोंदवण्यासाठी आलेल्या छत्तीसगड राज्यातील तिर्थयात्रेकरूंसाठी मंगल कार्यालयात राहण्याची व्यवस्था करुन त्यांना येण्या जाण्यासाठी पंधरा बसेसची व्यवस्था करण्यात आली होती तसेच एक हजार गाद्यांची व्यवस्था करण्यात आली होती यावेळी तिर्थयात्रेकरुना पिण्यासाठी मंगल कार्यालयातील प्रत्येक रुममध्ये शुध्द पिण्याच्या पाण्याचे कॅन त्यांना सकाळी ०४-०० वाफेच्या सुमारास चहा यानंतर नाश्ता यात्रेकरूंची वाढती संख्या पाहता गुरुद्वारा बोर्ड प्रशासनाने गुरुद्वारा लायब्ररी,प्रभारी अधिक्षक आर.डी.सिंघ यांच्यासह सर्व अधिकाऱ्यांची कार्यालय चेअरमन वेटींग हॉल,गोलक हाल मिडिया सेंटर,अखंडपाठ हाल सिक्योरिटी ऑफिसचे हॉल देखील खाली करुन यात्रेकरूंना राहण्याची व्यवस्था करण्यात आली यावेळी यात्रेकरुंची संख्या पाहता गुरुद्वारा बोर्ड प्रशासनाने यात्रेकरुंच्या सोईसाठी खाजगी लॉज देखील बुक केले होते दहावी/बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा संपल्यामुळे आणि शनिवार रविवार सोमवार रोजी सुट्टी असल्याने अपेक्षेपेक्षा जास्त तिर्थयात्रेकरूंनी या धार्मिक होला मोहल्ला कार्यक्रमास उपस्थिती लावली परंतु सचखंड गुरुद्वारा बोर्ड प्रशासनासह यात्री निवासस्थानातील अधिकारी/कर्मचाऱ्यांनी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने तिर्थयात्रेकरूंच्या राहण्यासह चहापाणी नाश्त्याची व्यवस्था केल्याने तिर्थयात्री अक्षरशः भारावून गेले.

नांदेड येथील पवित्र सचखंड गुरुद्वारातील 'होला मोहल्ला' या धार्मिक उत्सवात प्रचंड संख्येने उपस्थिती लावलेल्या तिर्थयात्रेकरूंच्या लंगरची व्यवस्था गुरुद्वारा बोर्ड प्रशासनासह बाबा सुलाखनसिंघजी,बाबा काश्मीरसिंघजी,भाई मालोजी,बाबा दिपसिंघजी जत्रा अम्रीतसर,बाबा मेहेरसिंघजी नबीयाबादवाले आदींच्या वतीने करण्यात आल्याने अक्षरशः पंच पकवानांची लाट आली होती ३१ डिसेंबर प्रमाणेच दोन दिवस किर्तन दरबार व दिल्ली संगत व सेहगल परिवाराच्या जागोजागी मेडीकल कॅंम्प लावण्यात आले तर 'खालसा ॲड'च्या वतीने मिनरल वॉटर बॉटलची सेवा मोफत पुरवण्यात आली....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या