🌟पुर्णा रेल्वे कन्सुंमर डिझेल डेपोतील 'डिझेल चोरी' प्रकरणी लोकसभा सचिवालयाच्या चौकशी आदेशावर प्रश्न चिन्ह ?


🌟वरिष्ठ पातळीवरून डिझेल घोटाळ्यावर पडदा टाकण्याचे प्रयत्न : 'दाल में कुछ तो नहीं....बल्की पुरी दाल ही काली हैं'🌟

नांदेड/पुर्णा (वृत्त विशेष) - दक्षिण मध्य रेल्वे नांदेड विभागा अंतर्गत येणाऱ्या पुर्णा जंक्शन रेल्वे स्थानकावरील रेल्वे कन्सुंमर डिझेल डेपोतील ५ हजार ५०० लिटर डिझेल चोरी प्रकरण दि.२९ जानेवारी २०२४ रोजी परभणीत जिल्हा पोलिस दलाच्या स्थानिक गुन्हें शाखेच्या पथकाने दैठणा पोलीस स्थानकाच्या हद्दीतील सिंगणापूर फाटा परिसरातून रेल्वे डिझेल टँकर क्रमांक एम.एच.२१ बीएच ३९४४ हे ताब्यात घेऊन उघडकीस आणले या घटनेला जवळपास तीन महिन्यांचा कालावधी उलटल्यानंतर देखील या रेल्वे डिझेल घोटाळ्याची व्याप्ती वाढता कामा नये यादृष्टीने रेल्वे डिझेल घोटाळ्यातील संपूर्ण घोटाळेबाज प्रयत्नांची पराकाष्ठा करत असल्याने सदरील रेल्वे डिझेल घोटाळा प्रकरणावर परभणीचे खा.संजय जाधव यांनी दि.०८ फेब्रुवारी २०२४ रोजी संसदेत शुन्यकाळात प्रश्न उपस्थित करून पुर्णा जंक्शन रेल्वे स्थानकावरील रेल्वे कन्सुंमर डिझेल डेपोत ३०० करोड रुपयांच्या वर डिझेल घोटाळा झाल्याचे केंद्रीय रेल्वे मंत्रालयाच्या निदर्शनास आणून देऊन या प्रकरणातील घोटाळेबाजांवर कठोर कारवाईची मागणी देखील केली या घटनेला देखील जवळपास दिड महिन्यांचा कालावधी उलटत असतांना व दि.१५ फेब्रुवारी २०२४ रोजी लोकसभा सचिवालयाने पत्र क्र.झेडएच/एक्सआयआय/एक्सपी/२०२४/एलएसएस/टिओ/८० या पत्राद्वारे प्रधान मुख्य सुरक्षा आयुक्त रेल्वे सुरक्षा बल दक्षिण मध्य रेल्वे सिकंदराबाद यांना तीस दिवसांच्या आत चौकशी अहवाल सादर करण्याचे पत्रात नमूद केले होते याही आदेशाला दिड महिन्यांचा कालावधी उलटून गेल्याने या चौकशी आदेशावर देखील आता गंभीर प्रश्न चिन्ह निर्माण झाला आहे.

पुर्णा जंक्शन रेल्वे स्थानकावरील रेल्वे कन्सुंमर डिझेल डेपोतील डिझेल घोटाळ्याची व्याप्ती प्रचंड मोठी असल्याचे व या रेल्वे डिझेल घोटाळ्यात मोठमोठे मासे अडकण्याची शक्यता असल्याने या कोट्यावधी रुपयांच्या घोटाळ्यावर सोईस्करित्या पांघरूण घालण्याचे प्रयत्न होत असल्याचे निदर्शनास येत असून या रेल्वे डिझेल घोटाळ्याचे तार जुन्या रेल्वे गार्ड/टिसी रनिंगरुम ज्याचे स्टोअररुम मध्ये रुपांतर करण्यात आले या स्टोअररुम पर्यंत जुळलेले असल्यानेच दि.२६ फेब्रुवारी २०२४ रोजी रेल्वे कम्युनिटी हॉलच्या मागील स्टोअररुम म्हणून वापर होत असलेल्या जुन्या रेल्वे गार्ड/टिसी रनिंगरुमला आग लागली की लावण्यात आली ? असा प्रश्न उपस्थित केला जात असून या स्टोअररुमचा सर्व कारभार सांभाळणारे ओ.एस.लक्ष्मण जांबुतकर हे देखील यापूर्वी रेल्वे कन्सुंमर डिझेल डेपोत कार्यरत होते सदरील स्टोअररुमला आग लागल्यानंतर पित्तळ उघडे पडू नये याकरिता या स्टोअररुमचा संपूर्ण परिसर घाईघाईने अक्षरशः पत्र ठोकून सिल करण्याचे कारण काय ? या प्रकारामुळे या डिझेल घोटाळ्याच्या प्रचंड व्याप्तीचा अंदाज येत आहे त्याहीपेक्षा गंभीर बाब म्हणजे सदरील 'डिझेल घोटाळा' एकीकडे देशाची सर्वोच्च संस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संसदेत दि.०८ फेब्रुवारी २०२४ रोजी एका संसद सदस्याने गाजवला असतांना व लोकसभा सचिवालयाने चौकशी आदेश जारी केले असतांना देखील रेल्वे प्रशासनातील एक वरिष्ठ अधिकारी अवघ्या एक महिन्याच्या आत दि.०७ मार्च २०२४ रोजी पुर्णा रेल्वे कंज्युमर डिपोत चोरी झालीच नसल्याचे पत्र जारी करुन या डिझेल घोटाळ्यावर सोईस्करित्या पांघरूण घालण्याचा अत्यंत गंभीर प्रकार करतो यावरुन असे निदर्शनास येते की 'दाल में कुछ तो नहीं....बल्की पुरी दाल ही काली हैं'......


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या