🌟पुर्णा नगर परिषदेत बेताल मुख्याधिकारी भ्रष्ट कारभार पत्रकारांशी मुजोरी अन् भ्रष्ट गुत्तेदारांना मात्र सदैव खुलेद्वार.......!

🌟मुख्याधिकारी युवराज पौळ यांची पत्रकाराशी अरेरावी : म्हणे एकच काम आहे का मला ठेव फोन🌟

पुर्णा (दि.२१ मार्च) - पुर्णा नगर परिषदेत 'बेताल मुख्याधिकारी सर्वत्र भ्रष्ट कारभार पत्रकारांशी मुजोरी अन् भ्रष्ट गुत्तेदारांना खुलेद्वार एकंदर अश्या पध्दतीचा झाल्याचे निदर्शनास येत असून नगर परिषदेचे मुख्याधिकारी युवराज पौळ युवराजी तोऱ्यात वावरत चक्क पत्रकारानांच अरेरावीची भाषा वापरत असल्याने अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेने परभणीचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांना यांना लेखी स्वरूपात निवेदन देऊन आडमुठ् मुख्याधिकारी पौळ यांच्या विरोधात कारवाईची करण्याची मागणी केली आहे.


पुर्णा नगर परिषदेवर मागील दीड वर्षापासून प्रशासकाचे राज्य असल्यामुळे नगर परिषद मुख्याधिकारी युवराज पौळ यांच्या मध्ये आडमूठ पणाची भूमिका निर्माण झाली असून नगर परिषदेतील प्रशासकीय व्यवस्थेवर त्यांचे कुठल्याही प्रकारचे नियंत्रण नसल्यामुळे सर्वसामान्य जनतेला शुल्लक कामासाठी अनेक वेळा चकरा मारावे लागत आहे त्यातही नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांसह मुख्याधिकारी पौळ देखील नगर परिषदेत थांबत नसल्याने नगर परिषदेत केव्हाही गेले की अधिकारी/कर्मचाऱ्यांच्या रिकाम्या खुर्च्या नागरिकांना चिडवतांना दिसत आहेत त्यातच युवराजी तोऱ्यात वावरणारे मुख्याधिकारी महाशय सतत नगर परिषदेत गैरहजर राहत असल्यामुळे बांधकाम/पाणीपुरवठा/स्वच्छतेसह सर्वच विभागातील अधिकारी कर्मचारी सैरभैर झाल्याचे निदर्शनास येत आहे पूर्णा नगर परिषदेमध्ये गेल्या काही महिन्यापूर्वी रुजू झालेले मुख्याधिकारी युवराज पौळ हे अकार्यक्षम असून भ्रष्टाचाराला जास्त प्राधान्य देऊन बोगस कामांची बिले काढण्यामध्ये मग्न असतात त्यांची नगरपालिका कार्यालयावरील कर्मचाऱ्यांवर कोणतेही वचक व नियोजन नसल्यामुळे कर्मचारी मनमानी कारभार करत असतात.पूर्णा नगरपालिकेचे मुख्य अधिकारी युवराज पौळ हे पाटील शाहीच्या तोऱ्यात लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेला पत्रकाराला दमदाटी व अरेरावीची भाषा वापरून दम देतात.

 गेल्या काही दिवसांमध्ये दैनिक तरुण भारतचे प्रतिनिधी संपत तेली  पूर्णा नगरपालिकेत गेले असता त्या ठिकाणी नागरिकांची गर्दी जमलेली पाहून काय झाले विचारणा केली असता त्या ठिकाणी चार दिवसापासून रहिवासी प्रमाणपत्र, बांधकाम नोंदणी प्रमाणपत्र ,जन्म दाखला, मृत्यू दाखला प्रमाणपत्रावर सह्या होत नाही हे कळाले, संबंधित कर्मचारी हा सह्या करत नाही असे समजले विचारणा केली असता संबंधित कर्मचारी सही करणार नाही असे उत्तर मिळाले त्यानंतर कार्यालयीन अधीक्षक यांच्याकडे जाऊन विचारणा केली असता.आता सह्या होतील असे सांगण्यात आले परंतु तरी सह्या झाल्या  नाहीत.कर्मचाऱ्यांचे अंतर्गत वादामुळे सह्या होत नाही हे लक्षात आल्याने आमच्या प्रतिनिधी ने मुख्याधिकारी यांना दूरध्वनी वरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतु मुख्याधिकारी युवराज पौळ यांनी फोन कट केला त्यानंतर प्रतिनिधी ने टेक्स्ट मेसेज केला की साहेब नगरपालिकेत रहिवाशी वर सह्या होत नाहीत ज्याला अधिकार दिला ते कर्मचारी म्हणतात की मी सही करणार नाही तुम्ही मुख्याधिकारी यांना फोन करा मुख्याधिकारी युवराज पौळ यांना फोन केला असता त्यांनी माझा फोन कट केला त्यानंतर मी त्यांना टेक्स्ट मेसेज करून फोन केला तेव्हा त्यांनी मला एवढेच काम आहे का ? हां..ठेव फोन.. अशी आरेरावीची भाषा वापरून फोन कट केला अशी अपमानास्पद वागणूक दिल्यामुळे अखिल भारतीय पत्रकार परिषदेकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन मुख्याधिकारी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. जिल्हाधिकारी हे मुख्याधिकारी यांच्यावर कोणती कारवाई करतात याकडे शहरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या