🌟सकाळी निलंबनाचे आदेश, दुपारी लाच घेतांना रंगे हात पकडण्यात आले दुय्यम निबंधक छगन पाटील यांना अटक....!


🌟एसीबीची संभाजीनगरात मोठी कारवाई,दुय्यम निबंधकाच्या घरात तब्बल 1 कोटी 35 लाखांची कॅश मिळाली🌟

छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात एसीबीने (ACB) मोठी कारवाई केली असून, दुय्यम निबंधकाला लाच घेतांना रंगेहात पकडले आहेत. धक्कादायक म्हणजे दुय्यम निबंधकाच्या घरात तब्बल 1 कोटी 35 लाखांची कॅश मिळून आल्याने खळबळ उडाली आहे. योगायोग म्हणजे बेकायदेशीर दस्त नोंदणी प्रकरणात या दुय्यम निबंधकाच्या निलंबनाचे आदेश सकाळी सिल्लोड कार्यालयात धडकले, त्याची अंमलबजावणी होण्यापर्वीच लाच घेतांना त्याला रंगेहात पकडण्यात आले. छगन उत्तमराव पाटील (वय 49 वर्ष, रा. छत्रपती संभाजीनगर) असे या अधिकाऱ्याचे नाव असून, तो सिल्लोड येथील नोंदणी कार्यालयात कार्यरत होता. 

अधिक माहितीनुसार, सिल्लोडच्या नोंदणी कार्यालयात दुय्यम निबंधक म्हणून छगन उत्तमराव पाटील कार्यरत आहेत. दरम्यान, सिल्लोड तालुक्यातील आमठाना येथील तक्रारदार व त्यांची भावजयी यांची धावडा शिवारातील गट क्रमांक 47/1 मध्ये सामाईक शेती आहे. या शेतीचा दस्त तक्रारदार यांच्या पत्नीच्या नावे करण्यासाठी अर्ज करण्यात आला होता. मात्र दुय्यम निबंधक छगन पाटील याने 5 हजारांची मागणी केली. परंतु तक्रारदाराला लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यामुळे एसीबीच्या पथकाने 1 मार्च रोजी दुपारी दुय्यम निबंधक कार्यालयातच सापळा लावला. यावेळी तक्रारदाराकडून 5 हजार रुपयाची लाच घेण्यात आली. या प्रकरणी छगन पाटील आणि स्टॅम्प वेंडर भीमराव किसन खरात या दोघांना रंगेहात पकडण्यात आले आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या