🌟पुर्णा तालुक्यातील कावलगाव/धानोरा मोत्या परिसरात अवैध वाळू माफियांविरोधात महसूल प्रशासनाची धडक कारवाई....!


🌟नायब तहसीलदार प्रशांत थारकर व सहकारी पथकाने वाळू उत्खननासाठी वापरले जाणारे सेक्शन पंपांसह ट्रॅक्टर केले जप्त🌟 

🌟महसुलच्या पथकाने यावेळी धानोरा मोत्या येथे जप्त केलेले ०२ तराफे जागेवरच जाळून नष्ट केले🌟


पुर्णा (विशेष वृत्त) - पुर्णा तहसिल कार्यालयातील महसूल प्रशासनात कार्यरत नायब तहसीलदार प्रशांत थारकर यांनी तालुक्यातील पुर्णा/गोदावरी नदीपात्रातून होणाऱ्या अवैध वाळू उत्खननासह वाळू तस्करी विरोधात जोरदार कारवायांना सुरुवात केली असतांना देखील मुजोर झालेल्या वाळू माफियांची पिछेहाट झाली नसल्याचे निदर्शनास येत असून नायब तहसीलदार थारकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने आज मंगळवार दि.१२ मार्च २०२४ रोजी वाळू माफियांच्या विरोधात अविस्मरणीय धडक कारवाई करत ०१ ट्रॅक्टर ट्राली तर धानोरा मोत्या परिसरातील नदीपात्रातून वाळू उत्खननासाठी वापरले जाणारे सेक्शन पंप (इंजिन) २० एचपीची मोटर पथकातील धाडसी कर्मचाऱ्यांनी जवळपास तिन किलोमीटर अंतरावर उचलून आणून सरकारी गाडीत टाकली तर याच ठिकाणी जप्त केलेले ०२ तराफे जाळून नष्ट केले.

नायब तहसीलदार थारकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने विशेष म्हणजे आज मंगळवारी सकाळी०६-०० वाजतापासून दुपारी ०२-०० वाजेपर्यंत तब्बल ०८ तास सतत कारवाई करत पथकातील एकानेही कुठल्याही प्रकारची चालढकल नकरता उलट हसत खेळत आपसात एकी दाखवत कारवाई अर्ध्यावर न सोडता पूर्णत्वास नेली त्याबद्दल पथकाचे प्रमुख तथा नायब तहसीलदार प्रशांत थारकर यांनी पथकातील सहकारी कर्मचाऱ्यांचे कौतुक केले असून आपणासोबत काम करणे अभीमानास्पद असल्याचे नमूद केले आहे या धाडसी कारवाई वेळी नायब तहसीलदार थारकर यांच्या सोबत पथकातील सहकारी सदस्य श्रीमती चेटले मॅडम, सर्वस्वी श्री काकडे, गोरे, खिल्लारे, सरोदे, जोगदंड, साईनाथ, शेलाटे आदींची उपस्थिती होती......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या