🌟जगद्गुरू तुकोबारायांनी आपल्या अभंगातून समाजातील वाईट प्रथा परंपरावर अध्यात्मिक ओवीतून केला प्रहार...!


🌟जय तुकोबाराय जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज स्मृतिदीन (बीज) निमित्त मनःपूर्वक शुभेच्छा🌟

✍🏻स्मृतिदिन (बीज) विशेष - देवा पाटील परभणी 

 जगद्गुरू तुकोबारायांनी आपल्या अभंगातून समाजातील वाईट प्रथा परंपरावर अध्यात्मिक ओवीतून प्रहार करणारा खरा वारकरी विद्रोही 'तुकोबा' तुम्ही महाराष्ट्राची अध्यात्मिक, सामाजिक सांस्कृतिक चळवळ बघा अथवा राजकीय आपण 'तुकोबा' हा उंबरठा ओलांडल्याशिवाय पुढे जाऊ शकत नाही.एका छोट्याश्या खेड्यात जन्मलेला एक अवलिया पण स्वत:च्या अंतःशोधनातून आलेली परिपुर्णता अन् त्या शुध्द प्रतितीतून समाजाला केलेला उपदेश केलेला बदल. तुकोबारायांनी दाखवलेला हा भक्तीमार्ग इतका शाश्वत आहे की आज गेली साडेचारशे वर्षे हा महाराष्ट्र देश तुका म्हणे' गातोय, जगतोय. या साडेचारशे वर्षांत असा एकही मराठी माणूस सापडणार नाही ज्याला तुकोबारायांचा अभंग माहीत नसेल.तुकोबांच्या गाथेचा विचार घरोघरी पोहचलेला पाहिजे. आणि  तुकोबांच्या एकातरी ओवीचा स्पर्श आपल्या जीवनाला होऊद्या. आजच्या तरुण पिढीला खरा तुकोबाराय कळला पाहिजे.

जय तुकोबाराय जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज स्मृतिदीन (बीज) निमित्त मनःपूर्वक शुभेच्छा!

आपला 

संघर्ष योद्धा देवा पाटील...............

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या