🌟ग्रामीण भागात दर्जेदार शिक्षण देणे हेच आपले ध्येय - प्रदिप खाडे


🌟यश इंटरनॅशनलचे विद्यार्थी आंतरराष्ट्रीय पातळीवर झळकतील - उद्योजक सुरेशनाना फड

 🌟विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच व्यायामाकडे लक्ष द्यावे - सपोनि खोटेवाड


🌟विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराने रसिक झाले मंत्रमुग्ध यश इंटरनॅशनल सीबीएसई स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न🌟

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- दिंद्रुड सारख्या ग्रामीण भागात आम्ही शेतकरी, कष्टकरी आणि ऊसतोड कामगार कुटुंबातील विद्यार्थ्यांचे शिक्षण डोळ्यासमोर ठेवुन शाळा सुरु केली.आज आमच्या कै.रामभाऊ आण्णा खाडे संस्थेच्या अनेक शाळा,कॉलेजमधून शिक्षण घेत विद्यार्थी उच्च पातळीवर पोंहचत आहेत यामुळे ग्रामीण भागात दर्जेदार शिक्षण देण्याचे आमचे स्वप्न पुर्ण झाले असुन भविष्यात आणखी सुविधा उपलब्ध करु असे प्रतिपादन कै.रामभाऊ आण्णा खाडे संस्थेचे अध्यक्ष प्रदिप खाडे यांनी केले. स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलनात शालेय विद्यार्थी कलावंतांनी सादर केलेल्या कलाविष्काराने उपस्थित हजारो रसिकांना अक्षरशः मंत्रमुग्ध केले होते.


 कै.रामभाऊ आण्णा खाडे संस्थेच्या संगम फाटा दिंद्रुड येथील यश इंटरनॅशनल सीबीएसई स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन शुक्रवार दिनांक २२ मार्च रोजी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या अप्रतिम कलागुणांच्या कार्यक्रमासह पार पडले.या वार्षीक स्नेहसंमेलनाचे उद्घाटन दिंद्रुड पो.स्टे.चे एपीआय खोडेवाड यांच्या हस्ते करण्यात व संस्था अध्यक्ष प्रदीप खाडे यांच्या अध्यक्षतेखाली तर उद्योजक सुरेश नाना फड, मनोज गीते, प्राचार्य प्रा.अतुल दुबे, अंबाजोगाई, प्रदीप रोडे बीड, शिवाजीराव चाटे केज, जनकराव उबाळे सिरसाळा, राजेभाऊ चाटे केज, बालासाहेब राठोड धारूर, अजय चाटे केज, सचिन सानप, एस. पी. जाळकोट अंबाजोगाई वैजनाथ भोसले बापू, संजय हिबाने, ज्ञानेश्वर मगर सर, प्रफुल कोमतवार, रामराजे तोडकर सर,  भास्कर आंधळे, दिलीपराव पारेकर, गणेश गटकलं सर, शेख अनिस यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.यावेळी बोलताना प्रदिप खाडे यांनी कै.रामभाऊ आण्णा खाडे शिक्षण संस्थेच्या अनेक शाळा,महाविद्यालय ग्रामीण भागातच सुरु करण्यामागे आमचे उद्दीष्ट वेगळे होते ते पुर्ण होत असुन विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा तसेच शिक्षणाबरोबरच त्यांना सामाजिक कार्यक्रमाची माहिती व्हावी व त्यांना आनंद मिळावा. या उद्देशाने आम्ही उत्कृष्ठ नियोजनाखाली स्नेहसंमेलनाचे आयोजन करत असतो.संचालक विलास खाडे यांच्या नियोजनातून यश इंटरनॅशनल सीबीएसई स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य व शिक्षकवृंदांनी महिनाभरापासून याची विद्यार्थ्याकडून तयारी करून घेतली असल्याचे सांगितले.


तर उद्योजक सुरेश नाना फड यश इंटरनॅशनल स्कुलच्या नावातच आंतरराष्ट्रीय शिक्षणाचा पाया दडलेला आहे.यामुळे या शाळेतील विद्यार्थी लवकरच आंतरराष्ट्रीय पातळीवर झळकतील असा विश्वास व्यक्त केला. याप्रसंगी स्नेहसंमेलनानिमित्त विविध स्पर्धांमध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना बक्षिसे व प्रमाणपत्रे देवून गौरविण्यात आले. या वार्षिक स्नेहसंमेलनात चिमुकल्यांनी शेतकरी राजा,चला जेजुरीला जाऊ, कुर्ची मदायापेट्टी, कोळी गित, पाटलांबा बैलगाडा, लुट पुट गया रिमिक्स,बानु धनगरीन, दादाजी की छडी हूँ मै, बॉलीवुड रिमिक्स, लेजा' लेजा रे, गोंविदा मे शप, लुगी डान्स, खंडोबावा खंडा, नजरे आडव गाव, चंदा चमडे छमछम आदी गाण्यावर वेगवेगळ्या कला सादर करत उपस्थित मान्यवर व पालकांची मने जिंकली. या कार्यक्रमासाठी सर्व मान्यवर पदाधिकारी ,पत्रकार बंधूभगीनी, प्रतिष्ठित नागरिक, शिक्षक बंधूभगीनी , शिक्षकेतर कर्मचारी, आजी-माजी विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन सायली सचिन मुंडे, कोमल दामोदर मुंडे व आभार रागिणी रायकर मॅडम यांनी केले. संचालक विलास खाडे यांच्या नियोजनातून यश इंटरनॅशनल सीबीएसई स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य व शिक्षक वृंद यांनी परिश्रम घेतले.

@@@@@

* सपोनि खोटेवाड यांनी पोवाड्यातुन केले प्रबोधन 

 या वार्षिक स्नेहसंमेलनात दिंद्रुड पोलिस ठाण्याचे सपोनि खोटेवाड यांनी शेतकऱ्यांच्या समस्या व संघर्ष त्याच्यावरती  पोवाडा सादर करत प्रबोधन केले.तसेच विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबरच शारीरीक आरोग्याकडे लक्ष द्यावे असे आवाहन केले.

* प्रदिप खाडे यांचा सत्कार :-

     संपूर्ण महाराष्ट्रातातुन राजकिय,सामाजीक,शैक्षणिक,धार्मिक व इतर क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्या व्यक्तींचा देशातील सर्वात मोठ्या वृतपत्र समुह असलेल्या भास्कर ग्रुपच्या दिव्य मराठी च्या वतिने महाराष्ट्रातील चर्चित चेहरे म्हणुन सन्मान करण्यात आला.यात कृषीमंत्री ना.धनंजय मुंडे अध्यक्ष असलेल्या नाथ शिक्षण संस्थेचे सहसचिव,कै.रामभाऊ (अण्णा) खाडे सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष प्रदिप खाडे यांचा केंद्रिय मंत्री भागवत कराड यांच्या हस्ते सहकुटुंब सन्मान करण्यात आला. त्याबद्दल यश इंटरनॅशनल सीबीएसई स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य व शिक्षक वृंद यांच्या वतीने सत्कार करण्यात आला......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या