🌟पुर्णा तालुका अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या तालुका सचिवपदी गोविंद पांडुरंग मोरे यांची निवड....!


🌟त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे🌟

पुर्णा (दि.२१ मार्च) - पुर्णेतील तहसिल कार्यालयात तहसिल प्रशासन व अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या वतीने जागतिक ग्राहक दिन उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नायब तहसीलदार कृष्णाजी मस्के यांची तर प्रमुख उपस्थितांमध्ये पुर्णा तालुका अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे तालुकाध्यक्ष जनार्धन आवरगंड यांची होती.

यावेळी पुर्णा तालुका अखिल भारतीय ग्राहक पंचायतची कार्यकारिणी निवडण्यात आली पुर्णा तालुका अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या तालुका सचिव पदावर गोविंद पांडुरंग मोरे यांची निवड करण्यात आली असून त्यांच्या नियुक्तीचे पत्र त्यांना तालुकाध्यक्ष जनार्धन आवरगंड यांच्या हस्ते बहाल करण्यात आले त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.......


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या