🌟महाशिवरात्री विशेष : पाच हजार वर्षाचा इतिहास एकाच अखंड पाषाणात उभारलेले देशातील आठवे नागेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर...!


🌟हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ हे देशातील 12 ज्योतीलिंगापैकी आठवे ज्योतीलिंग🌟

हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ हें देशातील 12 ज्योतीलिंगापैकी आठवे ज्योतीलिंग आहे महाशिवरात्रीच्या निमित्ताने या मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होते काय आहे या मंदिरातचा इतिहास पाहा डिजिटल प्रभातची महाशिवरात्री निमित्ताने स्पेशल स्टोरी औंढा नागनाथ ज्योतिर्लिंग हे जग प्रसिद्ध आहे..येथील कला कौशल्य, प्राचीन असून पुरातत्व.हेंमाडपंथी मंदिर हे मराठवाड्यातील तीन ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग म्हणून जगप्रसिद्ध आहे. मंदिरावर नक्षीदार कोरीव काम आणि छटा जगभरातील भाविकांना.आकर्षित करतात. जगभरातून महाशिवरात्रीच्या निमित्ताने लाखोच्या संख्येने श्री नागनाथ प्रभूच्या दर्शनासाठी येत असतात.


*पाच हजार वर्षापूर्वीचे जुने हेमाडपंथी मंदिर*

हे मंदिर पाच हजार वर्षांपूर्वीचं असल्याचं सांगितलं जातं. संपूर्ण मंदिर काळ्या दगडात कोरलं असून यावर हत्ती, घोडे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यांचं कोरीव काम केल्याचं दिसून येतं. मंदिरात प्रवेश.करण्यासाठी मुख्य तीन दरवाजे असून मंदिराचा मुख्य भाग भूगर्भात आहे. भूगर्भातप्रवेश.केल्यानंतर.आपल्याला महादेवाची पिंड दिसते. ही पिंड महादेव आणि श्री विष्णू देवाची असल्याचं मानलं जातं.त्यामुळे नागनाथला हरिहर या नावानेही ओळखलं.जातं. त्यामुळे येथे पिंडीला दुर्वा, बेल, फुलं, नारळाची.आरास वाहिली जाते. श्रावण महिन्यात प्रभू शंकराचं दर्शन घेतल्याने भविकांच्या सर्व मनोकामना पूर्ण होत .असतात अशी मान्यता आहे.

*अखंड दगडावर जमिनीच्या पुष्ट भागावर मंदिराची रचना* 

भारतातील पवित्र बारा ज्योतिर्लिंगापैकी आद्य ज्योतिर्लिंग.मानल्या जाणाऱ्या नागनाथ (नागेश्वर) मंदिरासाठी औंढा हे.गाव प्रसिद्ध आहे. या गावात एकेकाळी आमर्दक सरोवर होते. हे मंदिर एका विस्तीर्ण 290x190 फुटी आवारात.असून त्याभोवती एक मोठा परकोट आहे. परकोटाला चार.प्रवेशद्वारे असून त्यातील उत्तरेकडील प्रवेशद्वारावर नगारखाना आहे. तेच मुख्य प्रवेशद्वार होय. आवारातच.एक पायविहीर असून तिचा नागतीर्थ असा उल्लेख केला.जातो. सासू-सुनेची बारव असेही तिला म्हणतात. मुख्य मंदिराची लांबी 126 फूट, रुंदी 118 फूट आणि उंची 96 फूट आहे. मंदिराच्या पश्चिमेस नामदेव महाराजांचे मंदिर व.सभामंडप आहे. औंढा हे संत नामदेवाचे गुरू विसोबा.खेचर यांचेही गाव आहे. त्यांची समाधी या परिसरातच.आहे.या मंदिराला कुठलाही पाया नसून जमिनीच्या पृष्ठ भागावर या.मंदिराची रचना केली आहे. तर संत श्रेष्ठ नामदेव महाराज यांच्या काळात संत नामदेव महाराज कीर्तन करत असतांना मंदिराने आपली जागा बदलली असल्याचा येथील भाविकांचा समज आहे. बाहेरुन मंदिराचे दोन भाग पाहायला मिळतात. पूर्वी मुघल.साम्राज्यात येथील मंदिराचा काही भाग मुघलांनी.पाडला असल्याचं सांगितलं जातं. यानंतरच्या काळात आहिल्याबाई होळकर यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार करुन मंदिराच्या कळसाची स्थापना केली असल्याची इतिहासात नोंद आहे.

औंढा नागनाथ, येथे महाशिवरात्री उत्सवाची जय्यत तयारी सुरू आहे. मंदिराची रंगरंगोटी, विद्युत रोषणाईची.कामे केली जात आहेत बुधवारपासून (ता. 6) यात्रा महोत्सवाला सुरवात होणार असून तो मंगळवारपर्यंत (ता.12) चालणार आहे.महाशिवरात्रीच्या दिवशी शुक्रवार (ता.8) श्री नागनाथाची पालखी सोहळा रात्री आठ वाजता होईल. सोमवारी (ता. 11) रात्री 10 वाजता रथोत्सव आणि महाप्रसाद वाटप केल्या जाणार आहे. विजया एकादशीचे कीर्तन सकाळी 11 ते 1या वेळेत होणार आहे.मंगळवारी (ता. 12) सकाळी 10 ते.12 या वेळेत नामदेव महाराज ढवळे चारठाणकर यांचे काल्याचे कीर्तन व त्यानंतर महाशिवरात्र उत्सवाची सांगता होणार आहे. या सर्व कार्यक्रमाचा.भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन.करण्यात आले आहे. देवस्थानचे अधीक्षक वैजनाथ पवार, व्यवस्थापक सुरेंद्र डफळ,.गार्डप्रमुख बबन सोनुने, कृष्णा पाटील, नागेश माने, रामप्रसाद उदगिरे, गणेश उदगिरे यांच्यासह संस्थानचे सर्व कर्मचारी यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. महाशिवरात्र यात्रेमध्ये.व्यापाऱ्यांनी दुकानदारांनी मोठ्यासंख्येने यावे असे आवाहन नागनाथ देवस्थान समितीच्या वतीने करण्यात आले. राज्य, परराज्यातून लाखोंच्या संख्येने औंढा नागनाथ येथे भाविक दाखल होतात. तसेच दिंड्या, पालख्या येतात. यंदाही हा उत्सव भव्य स्वरूपात.साजरा होणार आहे. त्यासाठी नागनाथ

देवस्थानने तयारी केलेली आहे..सीसीटीव्ही कार्यान्वित पोलिस.प्रशासनाकडून सुरक्षेच्या दृष्टिकोनातून.तयारीचा आढावा घेण्यात येत आहे..त्यांच्याबरोबर मंदिर व मंदिर परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित करण्यात आले आहेत. प्रत्येक हालचालीवर.पोलिस प्रशासनाचे लक्ष राहणार आहे.....

- शिवशंकर निरगुडे : हिंगोली

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या