🌟गावात पाणी प्रश्न गंभीर गावची तहान भागवण्यासाठी सरपंचाने विहिरीसाठी दिली स्वताच्या मालकीची जमीन....!


🌟सरपंचाचे पाणी प्रश्न सोडविण्यासाठी आटोकाट प्रयत्न सुरू🌟

🌟जल जीवन मिशनच्या योजनेवर नागरिक नाराज ....येलदरी येवजी बेलदरी पाॅइंट का निवडला🌟


 शिवशंकर निरगुडे - हिंगोली 

हिंगोली/सेनगाव : आताचे युगामध्ये सरपंचाला खूप महत्त्व असते सरपंच हा गावचा प्रमुख कना समजला जातो जिल्हा परिषद पासून ते केंद्र सरकार पर्यंत कोणत्याही योजना असो सरपंचाचा हात लागल्याशिवाय मूहूर्त होत नाही हे सर्वांना माहीत आहे  त्यामुळे प्रत्येक इच्छुकाला सरपंच होण्याचे डोहाळे लागतात लोक त्याला विश्वासाने पदाच्या खुर्चीवर बसवतात मात्र तो जनतेचा विश्वास तोडून स्वतांची तूमडी भरतो, आणि भ्रष्टाचाराच्या पापीचा भागिदार होतो स्वार्थी लोकप्रतिनिधी कडून विकास मात्र शून्य होत असतो  जे मोगमात येतात ते पाटोदा गाव सारखा विकासाचा इतिहास घडून जातात हे आपण कित्येकदा अनूभवलेल आहे. 

त्याचच एक उदाहरण सौ अर्चना शेखर देशमुख यांची गेल्या वर्षभरापासून गावांसाठी तळमळ जिद्दीने व तसेच जनतेनी दिलेला विश्वास वाया जाऊ देणार नाही या उद्देशाने गावात वेगाने विकास कामे सुरू आहेत स्वतासाठी नाही तर जनतेच्या हितासाठी स्वताच्या मालकीची दोन गूंठे जमीन जलमिशनच्या विहिरीसाठी दानपत्रक करून दिली आहे कारण जलमिशन योजनेचं गावात काम सुरू आहे

या योजनेत वेगवेगळ्या भागात दोन विहिरी मंजूर झाल्या एका विहिरीला पाणी लागले तर एक कोरडीठाक गेली असल्याने शासनाचा निधी वाया व जनतेचे स्वप्न भंग होऊ नये म्हणून जलस्त्रोत साठी स्वाताच्या मालकीची जमीन ग्रामपंचायतीला दानपत्रक करून दिली या स्तूत्य कार्यामूळे सरपंचाचा गावभरातून कौतुक सुद्धा केलं जात आहे

सध्या सेनगाव तालुक्यातील पानकनेरगांव येथे दिवसेंदिवस पाणीटंचाईने उग्ररुपधारण होत आहे. .भीषण पाणी टंचाई निर्माण झाल्याने ग्रामस्थांना पिण्याच्यासाठी भर उन्हांत वनवन भटकंती करावी लागत आहे तालुक्यात गतवर्षी झालेल्या अत्यल्प मौसमी पावसाने मार्च महिन्यातच जमिनीवरील जलस्रोत केव्हाचेच अटून गेले असून भूगर्भातील पाणी पातळी ही कमालीची खालावली आहे.

अजून एप्रिल आणि मे महिना बाकी आहे मार्च महिन्यातच काही मिटरने पाणी पातळी खालावल्याने पानकनेरगांव परिसरात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली असून ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भेडसावत आहे.  त्या अनुषंगानेच सरपंच सौ अर्चना देशमुख हे लवकरच कोरड्या विहिरीचा प्रस्ताव पास झाल्यानंतर दानपत्रक दिलेल्या स्वताची जमिनीमध्ये विहिरचे खोदकाम करून गावाची तहान भागवणार आहेत त्यांच्या उत्तम कार्यामुळे गावचा पाणी प्रश्न कायमचा मिटवणार का हे पाहण गरजेचे आहे.

🌟ग्रामस्थांच्या प्रतिक्रिया :

राज्यातील प्रत्येक नागरिकांना त्याच्या घरात नळाने शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा व्हावा या उद्देशाने केंद्र सरकारने  महत्वकांक्षी ‘हर घर जल’ योजना राबवली आहे हि योजना २०२४ पर्यंत पूर्ण करण्यासाठी जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागातर्फे निविदा प्रक्रिया राबवून ही कामे ग्रामपंचायत लोकप्रतिनिधींच्या देखभाल खाली  पूर्ण केली जात आहे सदर मात्र पानकनेरगाव हे लोकसंख्येन मोठ गाव आहे गाव परिसरात पाण्याचा भाग कोठेच नाही असे माहिती असतांनाही मागील वर्षातील सूज्ञ लोकप्रतिनिधीने येलदरी, येवजी बेलदरी, पाॅइंट का निवडला या असूज्ञ लोकांच्या लापरवाही मूळे पानकनेरगांवात केंद्र सरकारचा जल मिशन प्रकल्प मागील वर्षात सरपंच असलेल्या काळात पास झाला सदर हे गेल्या वर्षभरापासून या प्रकल्पाचे काम जोमाने सुरू आहे जलमिशनचे काम सध्या प्रगतीपथावर आहे जल मिशन योजनेची बेलदरी आणि वाढोणा तलावातील पाणी पुरवठा करणार्या दोन विहीरीचे काम जवळपास पूर्ण झाले आहे त्यामधील बेलदरी विहिरीला कामापूरते पाणी लागले सदर मात्र वाढोणा तलावातील विहिरी कोरडीठाक गेल्याने आता निधी वाया जाणार की काय असा प्रश्न सतावत होता सदर मात्र या विहिरीचा अहवाल वरिष्ठ पाणी पुरवठा अधिकार्याकडे पाठवला आहे हि विहीर रद्द करण्यात येणार असून जलभाग ठिकाणी विहिरी घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे सदर मात्र गाव परिसरात जल पातळीत पाणी नसल्याने सूज्ञ ग्रामपंचायत लोकप्रतिनिधीने येलदरी, येवजी बेलदरी,तलाव का निवडला हा रोष व्यक्त करत गावकर्यामध्ये नाराजीचा सूर उमटत आहेत

- प्रतिक्रिया :-


🌟सरपंच सौ.अर्चना शेखर देशमुख

उन्हाळ्याची तीव्र दाहकता पाहता पाणी पुरवठा विहिरीची पाणी पातळी दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे   बेलदरी तलावात असलेली जलमिशन योजनेच्या विहिरीच पाणी व तसेच आसपास असलेल्या शेतकऱ्यांच्या तिन ते चार विहिरीचे गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीत टाकण्याचे आटोकाट प्रयत्न सुरू आहेत काही दिवसांनंतर गावकऱ्यांना पाणी कमी पडू देणार नाही अशी देण्यात येत आहे तर एकीकडे जलमिशन प्रकल्पाचे काम वेगाने सुरू आहे त्या योजनेतील दोन विहिरीतील एका समाधान कारक पाणी तर एक विहीर कोरडीठाक गेल्याने तसा विहीर रद्द करण्याचा प्रस्ताव वरिष्ठ अधिकार्याकडे पाठवण्यात आला आहे  जलमिशन योजनेचा निधी वाया जाऊ नये म्हणून सौ अर्चना शेखर देशमुख यांनी स्वताच्या मालकीची दोन गूंठे जमीन ग्रामपंचायतीला दानपत्रक केली आहे प्रस्ताव पास झाल्यास लवकरच जलविहिरीचे काम पूर्ण करून गाव जलजिवन होईल असे प्रतिपादन सरपंच सौ अर्चना देशमुख यांनी केले....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या