🌟डॉ.भागवत राजपूत व डॉ विशाखा राजपूत दांपत्य दिल्ली येथे हेल्थ केअर पर्सनालिटी ऑफ द एयर अवाॅर्डने सन्मांनित.....!


🌟प्रतिष्ठेचा हेल्थ केअर पर्सनालिटी ऑफ द एयर मिळणे हे वैद्यकिय क्षेत्रातील तपश्चर्यचे फळ - डॉ. भागवत राजपूत

✍️ मोहन चौकेकर

चिखली : चिखली येथील डॉ.उदय राजपूत यांचे बंधु तसेच मुळ चिखली तालुक्यातील दिवठाणा येथील रहीवासी व सद्यस्थितीत दिल्ली निवासी डॉ. भागवत राजपूत व त्यांच्या सुविदय पत्नी डॉ. विशाखा राजपूत या दांपत्याला दिल्ली येथे वैद्यकिय क्षेत्रातील सेवेबद्दल हेल्थ केअर ऑफ पर्सनॅलिटी ऑफ द एयर या पुरस्काराने सन्मांनित करण्यात आले.सिक्स सिग्मा हेलयकेअर ग्रुप मागील 15 ते 15 वर्षांपासून पर्वतीय भागांमध्ये अत्यावश्यक वैद्यकिय सेवा पुरवितो. त्यांच्या सामाजिक कार्याची दखल देशाचे राष्ट्रपती, पंतप्रधान यांच्याकडून वेळोवेळी घेण्यात येते. कोवीड मध्ये डॉ भागवत राजपूत व डॉ विशाखा राजपूत  यांनी दिल्ली एनसीआर भागात तसेच पर्वतीय भागात उल्लेखनिय कामगिरी केली आहे. या संस्थेसोबत डॉ.भागवत भागवत व डॉ विशाखा राजपूत मागील बारा वर्षांपासून संलग्नं आहेत.

डॉ.भागवत राजपूत (MBBS.DNB. MIPS.MHAMPH.)  मुळ चिखली तालुक्यातील दिवठाणा येथील व सदयस्थितीत दिल्ली निवासी डॉ. भागवत राजपूत यांनी कोविड महामारीच्या काळामध्ये वर्ल्ड मेडिकल कॉलेज व हॉस्पिटल येथील कोचिड सेंटर 500 बेड मध्ये प्रशासक व मानसोपचार तज्ञ म्हणून कोविड रुग्णांना सुबिधा व सेवा दिल्या होत्या,  त्यांनी व्यंकटेश्वर हॉस्पिटल 325 बेड, आकाश हॉस्पिटल 200 बेड, महाराजा अग्रसेन हॉस्पिटल 100 बेड, मणिपाल हॉस्पिटल 350 बेड या हॉस्पिटल मध्ये कोविड़ रुग्णांना वैद्यकीय सेवा पुरविल्या होत्या. तसेच त्यांनी कोविड विषयी जागरूकता व कोविड प्रतिबंध, मानसिक आरोग्य या बाबत विविध ऑनलाईन व ऑफलाईन सेमिनार घेऊन जनतेमध्ये जागरूकता निर्माण केली होती.  हा  पुरस्कार म्हणजे त्यांनी केलेल्या कठोर मेहनत व रुग्ण्सेवेविषयी असलेली त्यांची आपुलकी दाखविणारा पुरस्कार आहे.

 आशियातील सर्वात मोठा नेतृत्व असलेला महाकुंभ 'सिक्स सिग्मा लीडरशिप समिट' आणि "सिक्स सिग्मा एक्सलन्स अवॉर्ड्स''चे आयोजन विज्ञान भवन दिल्ली  येथे करण्यात आले होते. यामध्ये आरोग्य क्षेत्रात उत्तम काम करणाऱ्या व्यक्तीचां सन्मान केला गेला यामध्ये आपल्या बुलढाणा जिल्ह्याचे चिखली तालुक्याचे दिवठाणा गावचे सुपुत्र डॉ.भागवत नारायण राजपूत यांना वायुसेना प्रमुख एअर चिफ मार्शल व्हि आर चौधरी यांच्या कडून  "हेल्थ केअर पर्सनालिटी  ऑफ द इयर अवॉर्ड" ने सन्मांनित करण्यात आले. तसेच डॉ. विशाखा राजपूत यांना देखील सम्मांनित करण्यात आले.

या समारंभात प्रमुख अतिथी, भूपिंदरसिंग हुडा, माजी मुख्यमंत्री (हरियाणा), सौरभ भारद्वाज, आरोग्य मंत्री, दिल्ली, यावेळी उपस्थित होते. लेफ्टनंट जनरल दलजित सिंग (DGAFMS) महासंचालक, सशक्त बाल वैद्यकीय सेवा, डॉ. धर्मिंदर नागर, पारस हेल्थकेअरचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक, डॉ. अभिजात सेठ, अध्यक्ष, वैद्यकीय विज्ञानातील राष्ट्रीय परीक्षा मंडळ (NBEMS). डॉ. बिस्वरूप रॉय चौधरी, संस्थापक आणि मुख्य संपादक, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड, आचार्य मनीष, संस्थापक हिम्स हॉस्पिटल आणि एशिया बुक ऑफ रेकॉर्ड, हरीश गुप्ता (क्रिएटिव्ह डायरेक्टर) सीईओ दादासाहेब फाळके एक्सलन्स अवॉर्ड आणि GIEBA, डॉ. राज एस. शहा - अध्यक्ष हेल्थ कौन्सिल सदस्य संचालक मंडळ - व्हील्स ग्लोबल फाउंडेशन - यूएसए,डॉ. अशोक ठाकूर, डायरेक्टर नाफेड व सोनू शर्मा - प्रेरक वक्ते यांनी सर्व जनतेला संबोधित केले.

यावेळी सत्काराला उत्तर देतांना डॉ. भागवत राजपूत यांनी हा पुरस्कार म्हणजे वैद्यकिय क्षेत्रामध्ये केलेल्या तपश्चर्येचे फळ असल्याची प्रतिक्रीया दिली.डॉ भागवत राजपूत व डॉ विशाखा राजपूत दापत्याला मिळालेल्या या गौरवामुळे संपूर्ण भारत देशामध्ये आपल्या बुलढाणा जिल्हाची मान उंचावली आहे.त्यामुळे डॉ भागवत राजपूत व डॉ विशाखा राजपूत यांच्यावर त्यांच्या संपूर्ण महाराष्ट्रातील तसेच संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यातील मित्र परिवार ,  चाहत्यांकडुन, रुग्णांकडून व नातेवाईकांकडून  अभिनंदनाचा वर्षाव होत आहे...


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या