🌟परभणी जिल्ह्यात आगामी लोकसभा/विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षांतराचे वारे वाहू लागले....!


🌟पुर्णा/पालम तालुक्यातील आजी/माजी लोकप्रतिनिधी/पदाधिकारी कार्यकर्त आ.डॉ.रत्नाकर काका गुट्टे मित्र मंडळात🌟 


परभणी जिल्ह्यातील राजकीय पक्षांत कार्यरत संकुचित मनोवृत्तीच्या पुढाऱ्यांनी 'दाल अब्दुल्ला गुड थैली में' या नितीमत्तेचा अवलंब सातत्याने चालवल्यामुळे पक्षतत्वांशी कायमस्वरूपी एकनिष्ठ राहून 'समर्थक/विरोधक' या खेळीत भरडलेले विविध पक्षांतील पक्ष कार्यकर्ते/पदाधिकारी आपल्या मौलिक अधिकारापासून आजिवन वंचित राहून आपल उभं आयुष्य उध्वस्त करुन घेत असल्याची गंभीर बाब समोर येत आहे स्वतःच्या स्वार्थापोटी वरिष्ठ पदाधिकारी लोकप्रतिनिधी पक्षभेद/तत्वभेद शत्रूत्व देखील विसरून एकत्रित येऊ शकतात मग पदाधिकारी/कार्यकर्ते का नाही ? असा प्रश्न डोळ्यासमोर ठेवून अनेकांनी आता आपला मातृपक्ष असलेल्या राजकीय पक्षाला सोडचिठ्ठी देऊन अन्य पक्षांमध्ये जाहीरपणे प्रवेश करण्यास सुरुवात केल्याचे पाहावयास मिळत आहे.

जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपले ।। १।। 

तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा ।।धृ

संतश्रेष्ठ तुकोबारायांच्या अभंगातील उपरोक्त ओवीचा अंगीकार करीत विविध पक्षांतील अनेक आजी/माजी लोकप्रतिनिधी पदाधिकारी कार्यकर्त्यांनी गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे यांच्याशी जवळीक साधून त्यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करीत आ.डॉ.रत्नाकर गुट्टे मित्र मंडळात जाहीर प्रवेश करीत असल्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांची विश्वासाहर्ता आणि लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत असल्याचे निदर्शनास येत असून आपल्या जवळील पदाधिकारी/कार्यकर्ते आर्थिकदृष्ट्या परिपूर्ण कसे होतील या दृष्टीने प्रयत्नशील असलेले जिल्ह्यातील एकमेव लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी आपली ओळख निर्माण केल्याचे पाहावयास मिळत आहे.


परभणी येथे काल शुक्रवार दि.१५ मार्च २०२४ रोजी आगामी लोकसभा/विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उबाठा), राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार), भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पार्टीसह मित्र पक्षांच्या महाविकास आघाडीचा सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी/पदाधिकारी कार्यकर्त्यांचा संयुक्त मेळावा सुरू असतांनाच जिल्ह्यातील गंगाखेड विधानसभा मतदारसंघात मात्र आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य कार्यकर्ता पक्ष प्रवेश सोहळा रंगल्याचे पाहावयास मिळाले या पक्षप्रवेश सोहळ्यात शिवसेना (उबाठा) जिल्हाप्रमुखांच्या गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील पुर्णा/पालम तालुक्यातील आजी/माजी लोकप्रतिनिधी पदाधिकारी कार्यकर्त्यांनी आ.डॉ.रत्नाकर गुट्टे काका मित्र मंडळात जाहीर प्रवेश केला यात पुर्णा तालुक्यातील ग्रामीण भागातील उभारत नेतृत्व छगन मोरे यांनी तालुक्यात सन १९९४ पासून शिवसेनेची पाळेमुळे रोवण्याचे काम केले तब्बल सात वर्षे शाखाप्रमुख,सात वर्षं उपसर्कल प्रमुख,आठ वर्ष सर्कल प्रमुख,सहा वर्ष तालुका प्रमुख आदी पदांची जवाबदारी यशस्वीरीत्या पार पाडीत मागील दहा वर्षांपासून ते पंचायत समिती सदस्य पदावर कार्यरत आहेत असे धाडसी नेतृत्व छगन मोरे यांच्या नेतृत्वाखाली पुर्णा कृषी उत्पन्न बाजार समितीचे मा.सदस्य चांदूमामा बोबडे तालुक्यातील पांगरा ढोणे ग्रामपंचायतीचे सरपंच उत्तमराव ढोणे,पुर्णा तालुका सरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष तथा तालुक्यातील माखणी ग्रामपंचायतचे सरपंच गोविंद आवरगंड,आहेरवाडी ग्रामपंचायतचे उपसरपंच तथा शिवसेना (उबाठा)चे शाखाप्रमुख सदाशिव मोरे,आहेरवाडी येथील सोसायटीचे व्हाईस चेअरमन डिगांबर खंदारे,चुडावा ग्रामपंचायतचे उपसरपंच महादजी देसाई,पुर्णा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य गिताराम देसाई, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी तालुका उपाध्यक्ष तथा आडत व्यापारी हरिभाऊ कदम आदींसह जवळपास एक हजार लोकांनी गंगाखेड विधानसभेचे लोकप्रिय आमदार डॉ. रत्नाकरजी गुट्टे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून तसेच गंगाखेड विधानसभा मतदार संघात होत असलेली विकास कामे,भविष्यातील मतदार संघातील व्हिजन विचारात घेवून आ.डॉ.रत्नाकर गुट्टे काका मित्र मंडळात जाहीर प्रवेश केला.


  या भव्य कार्यकर्ता पक्ष प्रवेश सोहळ्याच्या कार्यक्रमासाठी राष्ट्रीय समाजपक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष गणेशराव रोकडे, संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष किशनरावजी भोसले, मित्रमंडळाचे जिल्हाध्यक्ष प्रल्हादराव मुरकुटे,रासपा जिल्हाध्यक्ष अँड. संदीप आळनूरे, जिल्हासंपर्क प्रमुख संदीप माटेगावकर, प्रभारी माधवराव गायकवाड, प्रभारी हनुमंतराव मुंडे, प्रभारी सुभाषराव देसाई आदींसह असंख्य पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी उपस्थिती होती दरम्यान आगामी लोकसभा/विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करीत झालेल्या या भव्य पक्ष प्रवेश सोहळ्या मुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे......

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या