🌟आयपीएस अधिकारी मनोज शर्मा यांना पोलीस महानिरीक्षकपदी बढती....!


🌟त्यांनी याआधी नागपूर, कोल्हापूर, नांदेड,गडचिरोली,चंद्रपूर तसेच मुंबईसह विविध ठिकाणी वेगवेगळ्या पदांवर काम केले आहे🌟 

महाराष्ट्र पोलीस दलात उपमहानिरीक्षक (डीआयजी) पदावर कार्यरत असलेले महाराष्ट्र केडरचे आयपीएस अधिकारी मनोज शर्मा यांना पदोन्नती मिळाली असून त्यांची पोलीस महानिरीक्षक पदावर बढती झाली आहे.

केंद्र सरकारने २००३, २००४, २००५ बॅचच्या आयपीएस अधिकाऱ्यांना पदोन्नती देण्याचा निर्णय घेतला. यामध्ये मनोज शर्मा यांचे नाव आहे. मनोज शर्मा यांनी यासंदर्भातील माहिती देताना ‘एक्स’वर म्हटले, “एसपी’पासून सुरू झालेला प्रवास आज ‘आयजी’ होण्यापर्यंत पोहोचला. या प्रदीर्घ प्रवासात साथ दिल्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार.” मनोज शर्मा यांनी याआधी महाराष्ट्रातील नागपूर, कोल्हापूर, नांदेड, गडचिरोली, चंद्रपूर तसेच मुंबईसह विविध ठिकाणी वेगवेगळ्या पदांवर काम केलेले आहे...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या