🌟परभणी जिल्ह्यात प्रथम आलेल्या पुर्णा तालुक्यातील कान्हेगाव येथील जिल्हा परिषद शाळेला पारसबाग पाहणी पथकाची भेट...!


🌟यावेळी पथकाने शाळेचे नियोजन पाहून समाधान व्यक्त केले🌟पुर्णा :  आज दिनांक 02 मार्च 2024 रोजी राज्यस्तरीय परसबाग पाहणी पथक प्रमुख श्री.अंकुश शहागंटवार अधीक्षक प्राथमिक शिक्षण संचनालय महाराष्ट्र राज्य पुणे,श्री.अमोल आगळे पाटील,लेखाधिकारी पीएम पोषण,जिल्हा परिषद परभणी,श्री.दादाराव बुरकुले,लेखाधिकारी पीएम पोषण जिल्हा परिषद नांदेड,श्री.अवधूत गुंजेवार,अधिक्षक पीएम पोषण जिल्हा परिषद नांदेड,श्री.मारोती सुर्यवंशी,गटशिक्षणाधिकारी पूर्णा,श्री.सुंदर धवन केंद्रप्रमुख कावलगाव,श्री.श्यामसुंदर मोकमोड केंद्रप्रमुख पिंपळा लोखंडे यांनी परभणी जिल्हातील प्रथम क्रमांक आलेल्या  पूर्णा तालुक्यातील जिल्हा परीषद प्राथमिक शाळा कान्हेगाव या शाळेस परसबाग पाहणी अनुषंगाने भेट दिली. भेटी मध्ये पथकाने परसबाग पाहणी,शालेय परिसर,स्वच्छ्ता,साठारूम पाहणी,किचनशेड पाहणी,अभिलेख पाहणी,विद्यार्थ्यांशी हितगुज केले व शाळेचे नियोजन पाहून समाधान व्यक्त केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या