🌟वाशिम येथे जिल्हास्तरीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचे उद्घाटन....!


🌟राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचे उद्घाटन जिल्हाधिकारी भुवनेश्वरी एस यांच्या हस्ते करण्यात आले🌟


 
वाशिम :- वाशिम जिल्हा सामान्य रुग्णालयात आज रविवार दि.०३ मार्च रोजी सकाळी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचे उद्घाटन जिल्हाधिकारी भुवनेश्वरी एस व मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय वैभव वाघमारे यांचे हस्ते लहान बालकांना पोलिओचा डोज पासून करण्यात आले.


याप्रसंगी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुहास कोरे व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अनिल कावरखे यांनी जिल्ह्यात राबवण्यात येत असलेल्या पल्स पोलिओ मोहिमेबद्दल सविस्तर माहिती दिली. आज जिल्ह्यामध्ये सर्व दहाशे बावीस बूथ द्वारे एक लाख 28 हजार 296 बालकांना जवळच्या शाळा अंगणवाडी केंद्र, सर्व शासकीय दवाखाने इत्यादी ठिकाणी बूथ द्वारे पोलिओ लस देण्यात येणार आहे .तसेच दिनांक 4 ते 9 मार्च दरम्यान शहरी भागात व दिनांक 4 ते 6 मार्च दरम्यान ग्रामीण भागात आज पोलिओ लस घेण्यापासून वंचित राहिलेल्या बालकांना घरोघरी जाऊन डोज पाजण्यात येणार असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी सांगितले .याप्रसंगी माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी जिल्ह्यात प्रभावीपणे राबवल्या जात असलेल्या मोहिमेबद्दल आरोग्य यंत्रणेचे अभिनंदन केले .तसेच आजच्या मोहिमेची व्यापक प्रसिद्धी व जनजागृती आरोग्य यंत्रणेने केल्याने आजची मोहीम नक्कीच यशस्वी होईल असा आशावाद व्यक्त केला.याप्रसंगी आरोग्य अधिकारी कर्मचारी व नागरिकांची उपस्थिती होती.


प्रतिनीधी:-फुलचंद भगत

मंगरुळपीर/वाशिम


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या