🌟विश्वाच्या कल्याणाचे सामर्थ बुद्ध धम्म विचारात....!


🌟उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ.समाधान पाटील यांचे प्रतिपादन🌟


पुर्णा (दि.24 मार्च) - पुर्णा शहरातील बुद्ध विहार या ठिकाणी आज रविवार दि.२४ मार्च रोजी फाल्गुन पौर्णिमेनिमित्त जाहीर धम्मदेशना व सत्कार समारंभाचे आयोजन अखिल भारतीय भिकू संघाचे कार्याध्यक्ष भदंत डॉ. उपगुप्त महाथेरो व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महामानव तथागत भगवान बुद्ध सार्वजनिक जयंती मंडळाचे अध्यक्ष भदंत बोधीधम्मा यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.


यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर समाधान पाटील , पूर्णा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विलास घोबाडे तर प्रमुख सत्कारमूर्ती म्हणून कृषी विद्यापीठ परभणी येथील शास्त्रज्ञ डॉक्टर नीता गायकवाड ह्या होत्या.दुपारी १२-३० वाजता बुद्ध विहारात सामूहिक बुद्ध वंदना ग्रहण करून कार्यक्रमास सुरुवात झाली याप्रसंगी उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. समाधान पाटील यांनी आपल्या अभ्यासपूर्ण व्याख्यानामध्ये बुद्ध धम्माचा इतिहास विशद केला ज्यावेळी भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर अंधश्रद्धा कर्मकांड बुवाबाजी पसरली होती त्यावेळी तथागत भगवान बुद्धानी मानवतेवर समानतेवर आधारित असलेला विज्ञाननिष्ठ धम्म जगाला दिला.संपूर्ण जगाला मैत्रीचा संदेश देणारा बुद्ध धम्म श्रेष्ठ आहे भगवान बुद्धांनी कधीही कुणाचा द्वेष केला नाही संपूर्ण जग हे प्रेमाने जिंकले.


अकराव्या शतकामध्ये संत ज्ञानेश्वरांनी हाच विचार पसायदान मधून मांडलेला आहे भगवान बुद्धांनी त्यांना ठार मारण्यासाठी पाठवलेला हत्ती प्रेमाने शांत केला. परंतु ज्यांनी हा पिसाळलेला हत्ती पाठवला होता त्याला सुद्धा उदार अंतकरणाने माफ केले कोणत्याही प्रकारची सुडाची भावना ठेवली नाही प्रमुख सत्कारमूर्ती डॉ.नीता गायकवाड यांनी दर्जेदार शिक्षणाचे महत्त्व विशद केले. त्यांना विद्यार्थी विद्यार्थिनींनी विद्यार्थी दशेमध्ये आपला अमूल्य वेळ अभ्यासात घालवावा. उच्च व दर्जेदार शिक्षण घेऊन उच्च पदस्थ अधिकारी होऊन समाजाच्या प्रती असलेली आपली बांधिलकी दाखवावी आपण ज्या समाजामधून आलो आहे त्या समाजाच्या प्रती आपलं काही देणं आहे "पे बॅक टू सोसायटी"या भावनेतून वागलं पाहिजे प्रत्येक शहरातून गावातून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एकच सार्वजनिक जयंती निघाली पाहिजे.

जयंतीच्या माध्यमातून सलग अठरा तास अभ्यास उपक्रम व व्याख्यानाचे आयोजन केले पाहिजे कृषी विद्यापीठामध्ये त्यांनी सुरू केलेला 18 तास अभ्यासक्रम उपक्रम सातत्याने सुरू आहे भदंत डॉक्टर उपगुप्त महाथे रो यांनी माझ्यावर अगदी बालपणापासून धम्माचे संस्कार केले आमचं कुटुंब गेल्या तीन दशकापासून पूर्णा येथील बुद्ध विहाराला सातत्याने येत असत येथून मिळणारे धम्मतरंग आमच्यासाठी फार मोठे ऊर्जा स्थान आहे या कार्यक्रमांमध्ये सामाजिक कार्यकरत्या अर्चना पंडित निर्मले यांना राज्यस्तरीय नारी रत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला अखील भारतीय भिक्खू संघाचे कार्याध्यक्ष भदंत डॉ. उपगुप्त महाथेरो यांनी फाल्गुन पौर्णिमेचे महत्व विशद करून सत्कार समारंभ आयोजना पाठीमागची भूमिका विषद केली.

महामानव तथागत भगवान बुद्धांनी प्रज्ञा शील करुणा मंगल मैत्री च्या माध्यमातून बुद्ध धम्म दिला ज्ञानाचा अथांग महासागर बुद्ध कालीन नालंदा तक्षशिला विक्रम शीला इत्यादी विद्यापीठामध्ये होता बक्तियार खिलजीने नालंदा विद्यापीठ जाऊन टाकले त्या ठिकाणी असलेल्या भिकूंच्या कतली केल्या त्यापैकी बरेचसे भिकू विद्यापीठामधील मौल्यवान ग्रंथ घेऊन इतर देशांमध्ये गेले त्या ठिकाणी त्यांनी बुद्ध धम्म तत्त्वज्ञान पसरवलेज्ञविद्यार्थी विद्यार्थीनींनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित ग्रंथाचे वाचन केले पाहिजे त्यामधून निश्चितच पणे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास झाल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचा सल्ला त्यांनी विद्यार्थी वर्गांला दिला धम्मदेशने नंतर परभणी येथील श्रद्धा संपन्न रत्नमाला ताई व विलास वेडे या दांपत्याने आपल्या कन्येच्या स्मृतिदिनानिमित्त फाल्गुन पौर्णिमेच औचित्य साधून भिकू संघास चिवरदान फलदान व उपस्थितना खिरदान देण्यात आले.

कार्यक्रमास ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत प्रकाश कांबळे नगरपालिकेचे माजी उपाध्यक्ष गटनेते उत्तम भैया खंदारे नगरसेवक एडवोकेट हर्षवर्धन गायकवाड उद्योजक गौतम भोळे सामाजिक कार्यकर्ते दिलीप गायकवाड इंजिनीयर पीजी रणवीर जयंती मंडळाचे सचिव साहेबराव सोनवणे भारतीय बौद्ध महासभेचे माजी तालुकाध्यक्ष एम यु खंदारे बाबाराव वाघमारे ज्ञानोबा जोंधळे ज्येष्ठ धम्म उपासक वारा काळे अमृत मोरे किशोर ढाकरगे अतुल गवळी बोधा चार्य त्र्यंबक कांबळे उमेश बारहाटे पांडुरंग निर्मले शाहीर संभा गोधने डॉ. तूप समंदर हनवते गुरुजी शिवाजी थोरात मुंजाजी गायकवाड आदीसह सामाजिक धार्मिक क्षेत्रामधील मान्यवरांची उपस्थिती होती.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुरज जोंधळे इंजिनीयर विजय खंडागळे राम भालेराव प्रकाश जगताप नितीन सोनुले  आदीसह धम्म सेवेमध्ये कार्यरत असलेले महिला मंडळ निरंजना धम्म सेवाभावी महिला मंडळ रोहिणी धम्म सेवाभावी महिला मंडळ आम्रपाली महिला मंडळ विशाखा महिला मंडळ तक्षशिला महिला मंडळ माता रमाई महिला मंडळ वैशाली महिला मंडळ लिंबूनि महिला मंडळ सुजाता धम्म सेवाभावी महिला मंडळ आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीकांत हिवाळे यांनी केले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या