🌟ग्रंथ प्रदर्शन विक्री व विविध कार्यक्रमांचे आयोजन सकाळी दहा ते रात्री आठ वाजेपर्यंत होत आहे🌟
नांदेड (दि.१४ मार्च) : पुस्तक प्रेमींसाठी यावर्षीचा ग्रंथोत्सव १६ व १७ मार्च रोजी शनिवार व रविवारी जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय डॉ. शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहाशेजारी गुरुगोविंद सिंहजी स्टेडियम परिसर येथे होणार आहे. या ग्रंथ प्रदर्शनाचे लाभ घ्यावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे राज्य शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय नांदेड, यांच्या संयुक्त विद्यमाने, महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक धोरण अंतर्गत नांदेड ग्रंथोत्सव 2023 चे आयोजन करण्यात आले आहे. ग्रंथ प्रदर्शन विक्री व विविध कार्यक्रमांचे आयोजन सकाळी दहा ते रात्री आठ वाजेपर्यंत होत आहे. रसिक वाचकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
दोन दिवसीय ग्रंथ प्रदर्शनामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये शनिवारी 16 मार्च रोजी सकाळी साडेआठ ते साडेदहा या काळात महात्मा फुले पुतळा ते कार्यक्रम स्थळापर्यंत ग्रंथदिंडीचे आयोजन करण्यात आले आहे. या ग्रंथदिंडीमध्ये अप्पर जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वाडकर, ज्येष्ठ पत्रकार संजीव कुलकर्णी प्रजावाणीचे संपादक शंतनू डोईफोडे, दिगंबर क्षीरसागर, दत्ता डांगे यांच्या सह शाळकरी विद्यार्थी व अन्य मान्यवर सहभागी होणार आहे सकाळी 11 वाजता ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन होणार असून मराठवाडा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष.डॉ. जगदीश कदम यांच्या शुभहस्ते हे उद्घाटन होणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी शिक्षण संचालक लेखक व प्रसिद्ध वक्ते श्री. गोविंद नांदेड असतील .यावेळी व्यासपीठावर राज्याचे ग्रामविकास पंचायतराज व वैद्यकीय शिक्षण क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीश महाजन, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, खासदार प्रताप पाटील चिखलीकर, लोकसभा सदस्य खासदार सुधाकर शृंगारे ,खासदार हेमंत पाटील यांच्यासह जिल्ह्यातील सर्व मान्यवर लोकप्रतिनिधींची उपस्थिती असणार आहे.
दुपारी दोन ते चार या कालावधीमध्ये सार्वजनिक ग्रंथालयासमोरील समस्या व उपाय या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये रावसाहेब शेंदारकर, डॉ. गोविंद हंबर्डे,प्राध्यापक व्यंकट पावडे, बालाजी मार्लेवाड हे सहभागी होणार आहे. दुपारी चार ते सहा या कालावधीत कथाकथनाचा कार्यक्रम होणार असून यामध्ये दिगंबर कदम,राम तरटे, शंकर विभुते, श्रीमती स्वाती कानेगावकर यांचा सहभाग असणार आहे रविवारी सकाळी 11 वाजता कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून या कवी संमेलनाचे अध्यक्ष श्रीमती डॉ. ललिता शिंदे असतील. यामध्ये पंडित पाटील, नारायण शिंदे,प्र.श्री.जाधव, अशोक कुमार दवणे, आनंद पोपुलवाड,श्रीनिवास मस्के, शेख जावेद, बालिका बर्गड, साईनाथ राहटकर, शंकर राठोड, व्यंकट आनेराय यांचा समावेश असणार आहे.
दुपारी दोन ते चार या कालावधीत स्पर्धा परीक्षा काळाची गरज या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये श्रीकांत देशमुख, डॉ.यशवंत चव्हाण, सहभागी होणार आहे .समारोपाचा कार्यक्रम सायंकाळी चार वाजता होत असून समारोपीय कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ भगवान अंजनीकर असतील तर यावेळी शारदा कदम, राजू वाघमारे, बी.जी. देशमुख, राजेंद्र हंबीरे उपस्थित असतील. राज्य शासनाच्या या महत्त्वपूर्ण उपक्रमात नागरिकांनी सहभागी व्हावे व यानिमित्ताने होणाऱ्या ग्रंथ विक्रीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मीनल करनवाल, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, महानगरपालिका आयुक्त महेश कुमार डोईफोडे, ग्रंथोत्सव समन्वय समितीचे सदस्य सहाय्यक ग्रंथालय संचालक सुनील हुसे शिक्षणाधिकारी माधव सलगर, जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके, जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष गंगाधर पटने, प्रकाशक संघटनेचे निर्मल कुमार सूर्यवंशी, मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष प्रभाकर कानडखेडकर, सदस्य सचिव जिल्हा ग्रंथालय अधिकारी अनिल सूर्यवंशी यांनी केले आहे.....
0 टिप्पण्या