🌟पुर्णा तालुक्यातील ताडकळस येथील राधा ट्रेडर्स (मामा &भांजे ट्रेडर्स) ला भिषण आग.....!


🌟आगीत प्रचंड नुकसान: सुदैवाने कोणतीही जीवित हाणी नाही🌟 

पुर्णा (दि.२४ मार्च) - पुर्णा तालुक्यातील ताडकळस येथील बाजारपेठेलगत बसस्थानक परिसरातील सरकारी रुग्णालया समोर असलेल्या गणेश श्रीहरी कवठेकर यांच्या मालकीचे राधा ट्रेडर्स (जुने नाव मामा भांजे ट्रेडर्स) ला आज शनिवार दि.२३ मार्च २०२४ रोजी मध्यरात्री ११-४५ वाजेच्या सुमारास भिषण आगीला सुरूवात झाली सदरील आग इतकी भयंकर होती की आग विझवण्यात अडीच ते तिन तासांचा कालावधी उलटला  सदरील बाब काही जागरूक नागरिकांच्या निदर्शनास आल्यानंतर तात्काळ पुर्णा नगर परिषदेच्या अग्निशमन दलाला संपर्क साधण्यात आला परंतु अग्निशमन दलाच्या बंबात पाणी नसल्याने सदरील अग्निशमन दलाचे वाहन घटनास्थळी पोहोचण्यासाठी जवळपास एक ते सव्वा तासाच्या कालावधी लागल्यामुळे आगीने रौद्ररूप धारण केले होते व पहाता पहाता होत्याचं नव्हतं झालं या भयंकर आगीत संपूर्ण राधा ट्रेडर्स (मामा भांजे ट्रेडर्स) भस्मसात झाले.


ताडकळस येथील गजबजलेल्या परिसरातील या राधा ट्रेडर्स (मामा भांजे ट्रेडर्स) ला लागलेली आग काही केल्या आटोक्यात येण्याची शक्यता नसल्याचे व पुर्णेतील अग्निशमन दलाचा बंब वेळेवर पोहोचण्याची शक्यता नसल्याने परभणी येथील अग्निशमन दलाला पाचारण करावे लागले दोन बंबांचा वापर केल्यानंतर आग आटोक्यात आल्याचे समजते परभणी अग्निशामक दलाचे वाहन आज रविवार दि.२४ मार्च रोजी मध्यरात्री उशिरा ०२:३० वाजेच्या सुमारास पोहोचण्यापूर्वी पुर्णेतील अग्निशमन दलाचा बंब अर्थात वाहन घटनास्थळी पोहोचले होते अग्निशमन दलाच्या दोन्ही वाहनातील बाबांच्या साहाय्याने आग आटोक्यात आणण्यात यश आले या भिषण आगीच्या घटनेत सुदैवाने कोणतीही जिवित हानी झाली नाही परंतु आग कोणत्या कारणाने लागली असावी हे अद्यापही स्पष्ट झाले नाही यावेळी ताडकळस येथील शेकडो नागरिकांसह पोलीस प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी मदत कार्यात सहभागी झाले होते पुर्णेतील अग्निशामक दलाचे वाहन वेळेवर आले असते तर एवढ्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाले नसते असे मत नागरिकांतून व्यक्त केले जात आहे.

दरम्यान या भिषण आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेल्या राधा ट्रेडर्स (मामा भांजे ट्रेडर्स) या दुकानातील लाखों रुपयाचे ब्रॅण्डेड कलर (पेन्ट), दुचाकी चारचाकी वाहनांचे टायर्स बेल्ट,सिंन्टेक्स कंपनीच्या पाण्याच्या टाक्यांसह किंमती वस्तू जळून खाक झाल्यामुळे मामा भांजे ट्रेडर्सला दुकानदारांचे मिळण्याचे एकमेव ठिकाण राधा ट्रेडर्स (मामा भांजे टेंडर्स) या दुकानदारांचे लाखों रुपयांचे नुकसान झाले आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या