🌟परभणी शहरात शेतमाल विक्रीसाठी 'बाजार हॉटची' अनेक दिवसापासुन प्रलंबित असलेली मागणी पूर्ण करणार....!

(प्रगतसिल शेतकरी चंद्रकांत दादा वरपुडकर यांनी कुलगुरू डॉ. इंद्रमणी यांच्या नावाचा संशोधन केलेला आंबा  "इंद्रामणी"  प्रकाशित करतांना जिल्हाधिकारी प्रताप काळे व उपस्थित मान्यवर

🌟कुलगुरू डॉ.इंद्र मणी यांनी दिले आश्वासन🌟 

पूर्णा (दि.१२ मार्च) - परभणी शहरात शेतमाल विक्रीसाठी 'बाजार हॉटची' अनेक दिवसापासुन प्रलंबित असलेली मागणी पूर्ण करण्याचे अस्वासन अप्पर जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करून सोडवण्यात येइल अशी ग्वाही वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इंद्र मणी यांनी दिली कार्यक्रमाचे अध्यक्ष कुलगुरू डॉ. इंद्र मणि, प्रमुख पाहुणे डॉ. प्रताप काळे, जिल्हा कृषी अधिकारी रवि हरणे, उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे, माहिती तंत्रज्ञानचे डॉ. गजानन गडदे, प्रगतीशील शेतकरी चंद्रकांत वरपुडकर, कृषीभूषण कांतराव झरीकर, पत्रकार माणिक रासवे प्रमुख उपस्थिती होती.  


 भाजीपाल उत्पादक ग्रूप परभणीची त्रेमासिक बैठक पेडगाव येथील प्रगतसिल शेतकरी विजय जंगले यांच्या मळ्यात सोमवार (ता .११ ) घेण्यात आली . कार्यक्रमाची सुरुवात भाजीपाला ग्रूपचे प्रणेते स्वर्गीय दादा पवार यांच्या प्रतिमेचे पुजन करून करण्यात आली . कार्यक्रमासाठी नांदेड,जालना ,हिंगोली यवतमाळ ,परभणी पाच जिल्ह्यातील प्रगतसिल व उपक्रमसिल शेतकरी बांधवांची उपस्थित होती . कार्यक्रमाचे सत्कारमुर्ती माजी वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. यु.एन. आळसे, कृषी विज्ञान केंद्र परभणी डॉ. अमित तुपे, कारभारी होगे, रत्नाकर ढगे (सायाळा), परमेश्वर गिराम,भाजीपाला कृषी केंद्र शेख अस्लम, परमेश्वर शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.


पुढे बोलतांना अप्पर जिल्हाधिकारी प्रताप काळे म्हणतात स्वतः शेतीत काम करून पिकवलेला शेतमाल बाजारात विक्रीसाठी बसलेल्या शेतकऱ्यांनकडुनच समाजातील आधिकारी कर्मचारी व सदन व्यक्तीने खरेदी केली पाहीजे असे अवाहन केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी पंडितराव थोरात, रामेश्वर साबळे, प्रकाश हरकळ, रमेश राऊत, रमेश पवार, गोविंदराव दुधाटे, रत्नाकर ढगे,शंतनु देशमुख, मंगेश देशमुख आदीनी  प्रयत्न केले .कार्यक्रमाचे प्रास्ताविक जनार्धन आवरगंड यांनी केले सूत्रसंचालन कुलदीप देशमुख यांनी केले आभारप्रदर्शन विजय जंगले यांनी मानले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या