🌟विद्यार्थ्यांनी पदवीचा उपयोग जीवन व्यवहारासाठी करावा - प्राचार्य डॉ रामेश्वर पवार


🌟पवार महाविद्यालयातील पाचव्या पदवी प्रमाणपत्र वितरण सोहळ्याच्या अध्यक्षीय समारोप प्रसंगी बोलत होते🌟


पूर्णा (जं.) प्रतिनिधी - विद्यार्थ्यांनी पदवीचा उपयोग जीवन व्यवहारासाठी करावा असे प्रतिपादन प्राचार्य तथा सिनेट सदस्य डॉ. रामेश्वर पवार यांनी केले ते स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठांतर्गत स्वातंत्र्यसैनिक सूर्यभानजी पवार महाविद्यालयातील पाचव्या पदवी प्रमाणपत्र वितरण सोहळ्याच्या अध्यक्षीय समारोप प्रसंगी बोलत होते पुढे बोलताना ते म्हणाले की शिक्षण माणसाला कधीही घेता येते .शिक्षण नोकरीसाठी नसून सामाजिक जीवनात जागरूक नागरिक म्हणून शिक्षणाचा आपल्याला निश्चितच चांगला फायदा होतो. जीवनात शिक्षणासाठी आळस करू नये असेही त्यांनी यावेळी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले.या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. सुरेखा भोसले यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले की आपण पदवी वर्गापर्यंत घेतलेले शिक्षण आपल्यावर चांगले संस्कार करते. अनेक महान विभूतींचे जीवन आपण अभ्यासले पाहिजे.  त्यांच्या जीवनातील आदर्शांचे आपल्या जीवनात आचरण केले तर हे शिक्षणच आपल्याला जगायला प्रेरणा देते असे त्यांनी यावेळी आपल्या मार्गदर्शनात सांगितले.


याप्रसंगी आधिसभा सदस्य डॉ. विजय भोपाळे, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ भीमराव मानकरे हे उपस्थित होते.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक परीक्षा विभागाचे समन्वयक डॉ. मारोती भोसले यांनी केले.याप्रसंगी कला शाखा व ग्रंथालय व माहिती शास्त्रातील पदवी प्रमाणपत्राचे मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थी विकास विभागाचे समन्वयक प्रा. प्रकाश सूर्यवंशी यांनी केले तर आभार प्रा. पी.डी. सूर्यवंशी यांनी मानले.या कार्यक्रमासाठी महाविद्यालय प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाची सुरुवात प्रा.सुजाता घन यांनी विद्यापीठ गीताने केली तर समारोप सामुहिक राष्ट्रगीताने करण्यात आला.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परीक्षा विभाग व महाविद्यालयातील प्राध्यापक ,कर्मचारी यांनी मोठ्या प्रमाणात परिश्रम घेतले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या